Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : शरद पवार

Spread the love

काळजी करू नका मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे उद्गार  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत काढले . शिवाय असेल नसेल ती शक्ती बळीराजाच्या भल्यासाठी वापरण्यासाठी घडयाळाच्या चिन्हावर बटण दाबून राष्ट्रवादीला विजयी करा असं आवाहनही शरद पवार यांनी केले. निफाड येथील जाहीर सभेत शरद पवार यांनी पुन्हा भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही शेतीबाबत निर्णय घेतल्यामुळे देशातील शेती उत्पादन वाढले होते. परंतु आज काय परिस्थिती आहे. नवीन कारखानदारी आली नाही. शेती संकटात म्हणजे देशाची आर्थिक स्थिती संकटात येते. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली तर अर्थव्यवस्थेला मदत होते. शेतकऱ्यांची खरेदी करण्याची ताकद नसेल तर उद्योग, कारखाने संकटात येतात. तेच चित्र आज पहायला मिळत आहे कारण या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही असा आरोप पवार यांनी केला.

मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे कुठचा काळा पैसा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला नाही. शेतकऱ्यांचा व्यवसाय चलनबंदीच्या माध्यमातून संकटात आणला आणि शेतकऱ्यांना संकटात आणण्याचे पाप भाजप सरकारने केल्याची जोरदार टीकाही शरद पवार यांनी केली. व्यापारी बांधव सुरुवातीला मोदी नावाचा गजर करत होते आणि आता मोदींना काढून टाकण्याचा विचार करत आहेत. नशीब कळंल बिचार्‍यांना की हा गडी आपला नाही. हा कुणाचाच नाही, शेतकऱ्यांचा नाही व्यापाऱ्यांचा नाही. उद्योग धंद्यातील लोकांचा नाही. बेकारी वाढली हे केंद्रसरकारने जाहीर केले त्यामुळे नव्या पिढीचाही नाही, मग देश कुणासाठी द्यायचा यांच्या हातात देश द्यायचा म्हणजे मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे घटक आहेत त्यांच्या हातात देश देण्यासारखं आहे असेही शरद पवार म्हणाले.

आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला का सोबत घेतले. कारण ते शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतात. कधी कधी आमच्यावरही टीका करतात परंतु टीका केली तरी विचार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असतो. त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन दिल्ली कशी नरमत नाही हे बघतो असे सांगत एकदा दिल्लीत ताकद निर्माण झाली तर सरकारचे धोरण बदलू शकतो त्यासाठी मतदान करण्याचं आवाहन शरद पवार यांनी सभेत केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!