Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णतः साध्वी प्रज्ञाच्या पाठीशी , अत्याचाराची फाईल पुन्हा उघडण्याचीही तयारी

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी, साध्वी यांच्या उमेदवारीचे फडणवीस यांनी समर्थन तर केलेच पण या निमित्ताने विचारलेल्या अनेक प्रश्न्न उत्तरे देत स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भाजप त्यांच्या पूर्णतः पाठीशी असल्याचा सूर मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून जाणवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराचा संदर्भ देत, हिंदू संस्कृतीविरुद्ध षड्यंत्र रचणाऱ्यांना हे उत्तर असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले. तर, प्रज्ञा ठाकूर यांच्यावरील अत्याचारसंदर्भात एटीएसची केस नव्याने खोलण्याचे स्पष्ट संकेतही  फडणवीस यांनी दिले आहेत.

साध्वी प्रज्ञा यांना समर्थन देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , देशातील हिंदूंना बदनाम करण्याचा डाव आखल्यास, हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्यास, तसा नॅरेटीव्ह तयार केल्यास त्यांना उत्तर द्यावेच लागेल. हिंदूंना दहशतवादी बनविण्याची स्क्रीप्ट कोणी लिहित असेल, तर त्यास उत्तर मिळणारच. त्यामुळेच, पंतप्रधान मोदींनीही हिंदू संस्कृतीविरुद्ध डाव आखणाऱ्यांना हे उत्तर असल्याचे म्हटले.  शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वींनी केलेले वक्तव्य मात्र चुकीचेच असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

2008 च्या शपथपत्रामध्ये  साध्वींनी आपल्यावरील टॉर्चरसंदर्भात लिहिले होते. मग, आताच का तुम्ही साध्वी प्रज्ञा, साध्वी प्रज्ञा… करत आहात असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता.  एटीएस आपल्या नियंत्रणात आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञांवर झालेल्या अत्याचाराची फाईल तुम्ही नव्याने खोलणार का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना, जर साध्वी प्रज्ञा यांनी लिखित स्वरुपात तक्रार दिली, तर नक्कीच ती फाईल उघडण्यात येईल. संदर्भातील पुराव्यांचा दाखल घेऊनच ही फाईल उघडू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या टीव्हीवरील किंवा न्यूज चॅनेलवरील मागणीहून नव्हे, तर लिखीत स्वरुपात तक्रार प्राप्त झाल्यास एटीएसच्या तपासाची फाईल नव्याने उघडण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!