Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सरासरी 63.41 टक्के मतदान

Spread the love

गंगापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

 औरंगाबाद लोकसभा मतदार संघात दि. 23 एप्रिल, 2019 रोजी मतदान प्रक्रिया सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत शांततेत व सुरळीत पार पडली.  सायंकाळी सहा वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सरासरी 63.41 टक्के मतदान झाले असुन एकुण 11 लाख 95 हजार 242 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

            औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये 18 लाख 84 हजार 866 मतदार आहेत. त्यापैकी 6 लाख 58 हजार 167 पुरुष मतदार तर 5 लाख 37 हजार 70 स्त्री, अन्य पाच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  यामध्ये कन्नड लोकसभा मतदारसंघात (64.80%) 1 लाख 10 हजार 792 पुरुष तर 91 हजार 231 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद मध्य (62.19%) 1 लाख 08 हजार 396 पुरुष, 90 हजार 389 महिला मतदार, औरंगाबाद पश्चिम मतदार संघात (62.78%) 1 लाख 14 हजार 206 पुरुष, 93 हजार 619 महिला, अन्य चार मतदार, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात (62.80%) 1 लाख 06 हजार 120 पुरुष मतदार, 86 हजार 79 महिला मतदार, गंगापूर मतदारसंघात (65.89%) 1 लाख 12 हजार 847 पुरुष, 90 हजार 776 महिला मतदार तर वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये (62.07%) 1 लाख 05 हजार 806 पुरुष मतदारांनी तर 84 हजार 976 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक 65.89 टक्के मतदान गंगापूर मतदासंघात झाले तर सर्वात कमी 62.07 टक्के मतदान वैजापूर मतदारसंघामध्ये झाले.

मतदान केंद्रांवर मतदारांसाठी दिव्यांग मतदारांसाठी रँप, व्हीलचेअर, नि:शुल्क ऑटो रिक्षा आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!