Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिलांनाही आता भारतीय लष्करात जाण्याची संधी , ऑनलाईन नोंदणी सुरु

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतीय सैन्यदलात आता महिलांनाही संधी मिळणार असून आजपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे.  भारतीय सैन्यात पहिल्यांदाच पहिल्यांदाच सैनिक म्हणून महिलांची भरती होणार आहे. त्यासाठी  भरती प्रक्रियाही ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे. जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयानेही त्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार  ही भरती  करण्यात येणार आहे .
महिलांसाठी वेगळी बटालियन असण्याची शक्यता आहे. महिला लष्करी पोलीस असे या पदाचे नाव आहे. यापूर्वी 1992 पासून केवळ अधिकारी पदावरच महिलांची भरती करण्यात येत होती. आता जवानांच्या समकक्ष पदावर 100 जागांवर महिलांची भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी अटीं आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. महिलांचे शिक्षण कमीतकमी 10 वी पास, वय 17 ते 21, उंची 142 सेमी असायला हवी. तसेच महत्वाचे म्हणजे केवळ लग्न न झालेल्या मुलीच यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच घटस्फोटीत, विधवा स्त्रिया ज्यांना अपत्य नाही अशा महिलाही  अर्ज करू शकणार आहेत. तसे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!