Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकांचा कौल ‘आघाडी’लाच, पण विरोधी पक्ष नेत्यांना ईव्हीएम घोटाळ्याची वाटतेय भीती

Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होत असतानाच ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनेही शंका उपस्थित केली आहे.
मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

मंगळवारी मुंबईत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल पटेल आदींसह आप, तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम सीपीआय या पक्षांचे नेते उपस्थित होते. या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. “प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जात आहे.

रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरु असून प्रत्येक सरकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती आहे. प्राप्तिकर विभागाद्वारे भाजपाविरोधकांच्या घरावर छापे टाकले जात आहे. आम्हाला ईव्हीएमबाबतही शंका येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे याचा परिणाम मतांवरही दिसू शकतो”, असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.ईव्हीएममध्ये फेरफार शक्य आहे. १९१ पैकी फक्त १८ देशांमध्येच निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. विशेषत: छोट्या देशांमध्येच याचा वापर केला जातो. यापूर्वी अशाही काही घटना समोर आल्या आहेत ज्यात कोणतेही बटण दाबले तरी कमळलाच मत जात होते, असा दावा नायडूंनी केला. तर शरद पवारांनीही ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!