Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : राज्यात काही ठिकाणी ईव्हीएम यंत्राच्या तक्रारी वगळता १४ मतदार संघात शांततेत मतदान !!

Spread the love

महाराष्ट्र लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील महत्वपूर्ण लढती

>> अहमदनगर : सुजय विखे (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
>> जालना : रावसाहेब दानवे (भाजप) विरुद्ध विलास औताडे (काँग्रेस)
>> औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (शिवसेना) विरुद्ध सुभाष झांबड (काँग्रेस) इम्तियाज जलील (वंचित बहुजन आघाडी )
>> रायगड : अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
>> रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत (शिवसेना) विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) विरुद्ध निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
>> पुणे : गिरीश बापट (भाजप) विरुद्ध मोहन जोशी (काँग्रेस)
>> बारामती : कांचन कुल (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
>> माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विरुद्ध संजय शिंदे (राष्ट्रवादी)
>> सांगली : संजय पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना – महाआघाडी)
>> सातारा : नरेंद्र पाटील (शिवसेना) विरुद्ध उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
>> कोल्हापूर : संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
>> हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना – महाआघाडी)
>> जळगाव : उन्मेष पाटील (भाजप) विरुद्ध गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
>> रावेर : रक्षा खडसे (भाजप) विरुद्ध उल्हास पाटील (काँग्रेस) या शिवाय प्रत्येक मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी महायुती आणि महाआघाडीच्या उमेद्वारांसामोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कुठल्या मतदारसंघात कुठला उमेदवार विजयी होईल याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात आज १४ जागांवर ५५.०५ टक्के मतदान झालं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन खराब झाल्याच्या तक्रारी येत होत्या परिणामी अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्षात मतदान सुरु होण्यास विलंब झाला त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मुले अडथळे आले त्या त्या ठिकाणी मतदारांना मतदानासाठी वेळ वाढवून देण्यात आला . जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडलं.

राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. तेव्हा औरंगाबादच्या गोदावरी शाळेतील कंट्रोल युनिट खराब झाल्याची तक्रार आली. डमी मतदान करतानाच यंत्रात बिघाड झाल्याने या मतदान केंद्रावर दहा मिनिटे उशिरा मतदान सुरू झालं. औरंगाबाद येथीलच विहामांडवा गटातील टाकळी अंबड येथेही एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आली. तसेच वाहेगाव आणि वैजापूर तालुक्यातील गारज येथे सकाळीच मतदान केंद्रावर बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता. अहमदनगर येथील बोलहेगाव गाडीलकर शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदार वैतागले होते. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे अनेक मतदारांना मतदान केंद्र शोधण्यात अडचणी आल्या. त्यामुळे संतप्त मतदारांची मतदान केंद्रप्रुखांशी शाब्दिक चकमक उडाली. रायगडमध्ये तर मतदान केंद्र फुगे लावून आणि रांगोळी काढून सजवण्यात आले होते. औरंगाबादमध्ये टिकटॉकवर मतदान व्हायरल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तर येथील झाकिर हुसेन शाळा येथे बोगस मतदान करणाऱ्या एकास पकडले. जळगावमध्ये चोपड्यात माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी मतदान केले. जळगावमध्येच वाढत्या तापमानामुळे भोईटे शाळेच्या मतदान केंद्रावरील होमगार्डची प्रकृती ढासळल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहकुटुंब बारामतीतील काटेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केलं. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब मतदान केले . भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही  त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्यासह जालन्यात मतदान केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत मतदानाचा हक्क बजावला. सांगलीत अंथरुणाला खिळून असणाऱ्या संपतराव पाटील या निवृत्त शिक्षकाने स्ट्रेचरवरून जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!