Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निवडणूक आयोगाला उत्तर देताना साध्वी प्रज्ञासिंहठाकूरचे घुमजाव , मी शहिदांचा अपमान केलाच नाही…

Spread the love

निवडणूक आयोगाला उत्तर देताना साध्वी प्रज्ञासिंहठाकूरचे घुमजाव केले असून मी कोणत्याही शहिदाचा अपमान केलेला नाही, असे साध्वी प्रज्ञासिंहठाकूरने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिसीला उत्तर देताना प्रज्ञासिंह यांनी आपली बाजू मांडली आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी प्रज्ञासिंहला मिळाली असून, शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितले होते.

माझ्या वक्तव्यात कोणत्याही शहिदाच्या बलिदानाबाबत मी आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही. माझ्या संपूर्ण वक्तव्याचा विचार व्हावा. केवळ एका ओळीवरून कोणताही अर्थ काढू नये. तत्कालीन काँग्रेस सरकारकडून देण्यात आलेल्या यातनांविषयी मी बोलले आहे, असे तिने सांगितले.

माझ्याबरोबर जे काही घडले, ते मी जनतेसमोर ठेवले आहे आणि हा माझा अधिकार आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास मीडियाकडून करण्यात आला. जनभावनेचा आदर करत माझे वक्तव्य मागे घेतले आहे. निवडणुकीतील आचारसंहितेचा भंग होईल, अशी कोणताही कृती मी केलेली नाही आणि तसे विधानही केले नाही, असेही प्रज्ञासिंहने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्राचे तत्कालीन दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी माझा छळ केला. मी दिलेल्या शापामुळेच त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला,’ असे विधान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!