Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संविधान वाचविण्याची क्षमता असलेल्या धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या काँग्रेसला आंबेडकरी नेत्यांचा पाठींबा

Spread the love

आंबेडकरद्रोही बहुजन अल्पसंख्यांक विरोधी भाजपा चा पराभव करण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन आंबेडकर चळवतील जेष्ठ नेत्यांनी केले आहे. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना या नेत्यांनी म्हटले आहे कि,  सध्याच्या प्राप्त राजकीय परिस्थितीचे अवलोकन केले असता देशात संविधान व लोकशाही टिकण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पुरस्कार करणे गरजेचे असुन देश पातळीवरील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष व आंबेडकरी तत्वज्ञान मध्येच हिंदुत्ववादी पक्ष व विचारधारेला थोपविण्याची क्षमता असल्याकारणाने संपूर्ण आंबेडकरी समाजाने बहुजन व अल्पसंख्याक समाजाने संविधानीक मुल्य टिकविण्याकरीता तसेच आंबेडकरी अल्पसंख्याक व बहुजन समाजाने काँग्रेसला मतदान करणे काळाची गरज निर्माण झालेली आहे.

धर्मनिरपेक्षता हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा पाया होता पण आज काहीजण बाबासाहेबांचे धर्मनिरपेक्ष मुल्याधिष्ठीत राजकारण नजरेआड करून धर्माध पक्षाच्या गळ्यात गळे घालून भाजपाला मदत होईल अशी रणनीती आखीत आहेत.
पंतप्रधान मोदी व भाजपच्या हुकूमशाहीच्या राजवटीला संबंध बहुजन आंबेडकरी व अल्पसंख्याक समाजाला मोठा फटका बसला असुन संविधानीक तरतुदीच्या माध्यमातून मिळालेल्या हक्कावर तसेच सवलतीवर मोठे संकट हिंदुत्ववादी विचारधारेमुळे आलेले आहेत. अनुसूचित जाती व जनजाती, अल्पसंख्याक, समाजावर यांच्या शासन काळात
झालेले अन्याय अत्याचारमुळे संबंध बहुजन समाज होरपळून निघालेला आहे संविधानीक मुल्य पायदळी तुडविल्या जात असून देशाची सर्वोच्च न्याय संस्था सुध्दा या हुकूमशाही
व हिंदुत्ववादी विचारधारेमुळे बाधीत झालेली असुन संबंध न्याय व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाल्याची जनसामान्याची भावना  झालेली आहे.

अनुसूचित जाती व जनजातीसाठी असलेला अॅट्रॉसिटी अॅक्टचा कवच कुंडल काढून  घेण्याचे  षडयंत्र,  भारताचे संविधान बदलण्याची भाषा करण्याइतपत मजल झालेल्या हुकूमशाह राजवटीला उलथून लावण्याचे आवाहन आज भारतीय जनतेसमोर निर्माण झाले आहे. सर्वस्तरावर भारतीय लोकशाहीची पिछेहाट झालेली असून देशातील नागरीकात असुरक्षितेची भावना निर्माण शालेली आहे. अनुसूचित जातीची सर्वस्तरावर होणारी प्रगती हेतुपुरस्सरपणे थांबविण्याचा तसेच आरक्षण रद्द करून हिंदुत्ववादी संविधान देशात लागू करण्याची इच्छा असलेल्या भाजपला राष्ट्रीय पातळीवर धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसच करू शकते. तेव्हा संविधान टिकविण्याची व वाचविण्याची क्षमता असलेल्या काँग्रेसलाच बहुजन अल्पसंख्याक व आंबेडकरी समुदायाने मतदान करावे असे आवाहन जिल्ह्यातील जेष्ठ आंबेडकरी नेत्यांनी केले आहे.

या निवेदनावर आंबेडकरी पक्ष संघटनांचे नेते माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, रतनकुमार पंडागळे, दिनकर ओंकार, रमेश गायकवाड, अनिलकुमार सोनकामळे, माणिक साळवे, पंडितभाई नवगिरे, प्रकाश गायकवाड, किशोरजाधव, सुरेशशिनगारे, सर्जेरावमनोरे, सागरकुलकर्णी, शांतीलाल गायकवाड, मधुकरचव्हाण, अमोलदांडगे, रवी जावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!