Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंदुत्वाचा मुद्द्यावरुन मोदी, शहा, योगीच्या मदतीला आता साध्वी प्रज्ञा : आक्रमक प्रचार

Spread the love

 

हिंदू मुस्लिम मत विभाजनाचा थेट फायदा व्हावा या उद्देशाने भाजप आक्रमक झाली असून मोदी, शहा , योगी आदित्यनाथ आणि आता साध्वी प्रज्ञा या वादात उतरल्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर देशभरात निर्माण झालेला प्रक्षोभ शमत नाही तोच, भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बाबरी मशिदीबाबत पुन्हा एकदा स्फोटक विधान केले आहे. ‘आपण केवळ बाबरी मशिदीवर चढलो नव्हतो, तर तिला पाडण्यासाठीही मदत केली होती. आता आम्ही राम मंदिरही उभारू’ असे नवे विधान करत नवा वाद ओढून घेतला आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळमधील एका प्रचारयात्रेदरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी राम मंदिर नक्कीच बनवले जाईल. ते एक भव्य असे मंदिर असेल असे म्हटले. त्यावर केव्हा पर्यंत राम मंदिर निर्माण होईल असा प्रश्न साध्वींना विचारण्यात आला. त्यावर आम्ही मंदिर बनवणारच, शेवटी आम्ही बाबरी मशीद उद्ध्व्सस्त करण्यासाठीही गेलो होतो, असे साध्वी म्हणाल्या. मी स्वत: मशिदीवर चढून मशीद तोडली होती. ईश्वरानेच मला ही संधी दिली, शक्ती दिली आणि मी हे काम केले, याचा मला गर्व आहे. आता आम्ही तिथेच राम मंदिर बनवणार असे त्या पुढे म्हणाल्या.

निवडणूक आयोगाचा ईशारा

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावली. इतकेच नाही, तर मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांता राव यांनी सर्व राजकीय पक्षांना निर्देशही जारी केले. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा आचार संहितेचे उल्लंघन केल्यास, तसेच अपमानजनक भाषेचा प्रयोग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट शब्दात कांता राव यांनी राजकीय पक्षांना बजावले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!