Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभेचा पहिला टप्पा : कुठे काय झाले ? माध्यमांच्या ‘ब्रेकिंग’ मधून…

Spread the love

शेवटी काहीही झाले तरी माध्यमांचा लोकशाही टीकविण्यात मोठा वाटा आहे म्हणूनच माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात ते उगीच नाही. कुणी कितीही मिडिया विकत घेऊ देत , तळ हातानं सूर्य झाकता येत नाही हेच खरे आहे. माध्यमे समोर आहेत म्हणून थोड्या फार प्रमाणात लोकशाहीची अब्रू शिल्लक आहे. याच भूमिकेतून काल पार पडलेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात कुठं काय घडलं यांच्या ब्रेकिंग न्यूज दिलेल्या जात होत्या हे विशेषच आहे.  काल जेंव्हा  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचं  मतदान पार पडलं. त्यावेळी अनेक मतदान केंद्रांवर किरकोळ हिंसक घटना घडल्या.

आंध्रप्रदेशमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत दोनजण ठार झाले. तर महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयडी स्फोटात तीन जवान जखमी झाले. देशात काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी आल्या. तर काही ठिकाणी मतदार यादीतून मतदारांची नावंच गायब असल्याचं समोर आलं. पुच्छमध्ये तर पंथाचे बटनच काम करीत नसल्याच्या तक्रारी खुद्द मतदान अधिका-यांनीच केल्याचा व्हिडिओ बघायला मिळाला.

निवडणूक आयोगाच्या मते या काही घटना वगळता ९१ लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं.

लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना  आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. तर टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू, आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, अब्दूल्ला  यांनी प्रशासनाच्या चुकीवर बोट ठेवत तक्रारी नोंदवल्या आहेत.

लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ जागांसाठी  आंध्र प्रदेशात मतदान झालं. येथील अनंतपुरम जिल्ह्यातील तडीपत्री विधानसभा मतदारसंघातील विरापूरम गावात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसचे कार्यकर्ते आपआपसांत भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांवर प्रचंड दगडफेक केल्याने त्यात दोन्ही पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. वायएसआर काँग्रेसला निवडणूक जिंकण्यासाठी हिंसा करावी लागत असल्याचा आरोप चंद्राबाबूंनी केला. मात्र वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबूंचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

गडचिरोलीत मतदान संपताच नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कमांडो पथकावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून केलेल्या या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील पुरसगोंदी मतदान केंद्रावरून निघालेल्या पोलीस आणि कमांडो पथकाच्या बेस कँम्पला नक्षलवाद्यांनी टार्गेट केलं. या नक्षलवाद्यांनी बेस कँम्पजवळ आधी आयडी स्फोट घडवून आणला आणि नंतर कमांडोच्या दिशेनं गोळीबार केला. त्यात तीन कमांडो जखमी झाले असून जखमी कमांडोंना हेलिकॉप्टरने नागपूरला उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

दरम्यान त्यामानानं गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याचा अपवाद वगळता महाराष्ट्रात इतरत्र कुठेही गंभीर अनुचित प्रकार घडला नाही. गडचिरोलीत असं काही घडण्याची शक्यता होती म्हणूनच आयोगाने चार मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याची भूमिका जाहीर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!