Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मतदान करून परतणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात , ३ ठार ९ जखमी

Spread the love

गडचिरोलीमध्ये देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परत येताना डोंगर मेंढा गावानजीक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला असल्याची माहिती आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलिवण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरमधून दहा ते बारा जणांना शंकरपूर मतदान केंद्रावर नेण्यात येत होतं. मात्र मतदान झाल्यानंतर पुन्हा घरी परतताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!