Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur Loksabha : बीआरएसपीचे सुरेश माने आणि बसपा उमेदवार मोहम्मद जमाल यांच्या प्रचार रॅलींनी दुमदुमले नागपूर

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड सुरेश माने यांनी झंझावाती प्रचार केला. दक्षिण नागपुरातील प्रचार कार्यालयातून सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. निळे झेंडे, प्रचाररथ, दुचाकीवर स्वार कार्यकर्त्यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा देऊन रॅलीद्वारे शहरभर प्रचार केला.
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड सुरेश माने यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाररथ, दुचाकी, आॅटोवर पक्षाचे झेंडे घेऊन बीआरएसपी जिंदाबाद, अ‍ॅड सुरेश माने तुम आगे बढो, बीआरएसपी आयी है, नयी रोशनी लायी है, वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा दिल्या. रॅली म्हाळगीनगर, गजानननगर, महाकालीनगर, बेलदारनगर, वैभवनगर, दिघोरी, वाठोडा, खरबी चौक, हिवरीनगर, पडोळेनगर, शास्त्रीनगर, नंदनवन, मोठा ताजबाग, डायमंडनगर, भांडेप्लॉट, सक्करदरा झोपडपट्टी, अयोध्यानगर, नवीन सुभेदार, आशीर्वादनगर, संजयनगर, वैष्णोमातानगर, सिद्धेश्वरनगर, भोले बाबानगर, उदयनगर, जानकीनगर, आकाशनगर, ज्ञानेश्वरनगर, जुना सुभेदार, महात्मा फुलेनगर, रिपब्लिकन वसाहत, भगवाननगर या मार्गाने काढण्यात आली. मानेवाडा येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन अ‍ॅड सुरेश माने यांच्या एअर कंडीशनर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. रमेश पिसे, दिनकर वाठोरे, संतोष ठवरे, दादा हटवार, राहुल सुर्यवंशी, श्रीराम कोसे, अ‍ॅड वासुदेव वासे, अ‍ॅड विकास गणवीर, प्रेमकुमार म्हैसकर, पुरुषोत्तम कामडी, संजय हटवार, हरिकिशन हटवार, मनोज गजभिये, सत्यविजय गोंडाणे, लक्ष्मण खोब्रागडे, सौरभ गाणार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बसपा उमेदवार मोहम्मद जमाल यांची प्रचार रॅली

बहुजन समाज पार्टीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांच्या प्रचारार्थ नारी रोड येथील बसपाच्या प्रदेश कार्यालयासमोरून प्रचार रॅली काढण्यात आली. निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी केले.
रॅलीत बसपाचे महासचिव पृथ्वी शेंडे, प्रदेश सचिव प्रा. भाऊ गोंडाणे, नागोराव जयकर, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, शहर प्रभारी योगेश लांजेवार, शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, किशोर कैथेल, महिला नेत्या रंजना ढोरे, चंद्रशेखर कांबळे, आनंद सोमकुवर, मिलिंद गजभिये, प्रताप सूर्यवंशी, तपेश पाटील, मुकेश मेश्राम, सुरेखा डोंगरे, सुनंदा नितनवरे, नगरसेवक तसेच शहरातील जिल्हा, विधानसभा, सेक्टर पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीत बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी निळे झेंडे घेऊन मोहम्मद जमाल यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. बसपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निळे, हिरवे झेंडे घेऊन ‘जो बहुजन की बात करेगा, वो दिल्ली से राज करेगा’, ‘एससी, एसटी, ओबीसी, भारत के है मूल निवासी, ‘जयभीम का नारा गुंजेगा, भारत के कोने कोने मे’, व्होट हमारा राज तुम्हारा, नही चलेगा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. हत्ती या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून मोहम्मद जमाल यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. रॅली कपिलनगर, विनोबा भावेनगर, नागसेनवन, पंचशीलनगर, लष्करीबाग, इंदोरा, जरीपटका, गोरेवाडा, गिट्टीखदान, सेमिनरी हिल्स, फुटाळा, पांढराबोडी, धरमपेठ चौक, व्हेरायटी चौक, धंतोली, घाट रोड, जाटतरोडी, शताब्दी चौक, मानेवाडा, तुकडोजी चौक, मेडिकल, रेशीमबाग, महाल, गोळीबार चौक, कमाल चौक या मार्गाने काढण्यात आली. इंदोरा मैदानात रॅलीचा समारोप करण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!