Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बँकेच्या कर्जदारांना किंचितसे अच्छे दिन !!

Spread the love

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बँकेने व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने व्याजदरात ०.०५ टक्के इतकी किरकोळ कपात केली आहे. एसबीआयचे नवे दर उद्यापासून लागू होतील. इंडियन ओव्हरसीज बँकेने एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी असलेल्या कर्जांवरील व्याजदरात ०.०५ इतकी कपात केली आहे. यानुसार बँकेचा ८.६५ टक्के इतका नवा व्याजदर असेल.
एसबीआयने ८.५५ टक्के व्याजदरात कपात ०.०५ इतकी कपात करत ८.५० टक्के व्याजदर लागू केलेत. तर ३० लाख रुपयांच्या गृहकर्जावरील व्यादरात एसबीआयने ०.१० टक्के कपात केली आहे. यानुसार नवा व्याजदर ८.६० ते ८.९० टक्क्यांपर्यत असेल. रिझर्व्ह बँकेने अलिकडेच आपल्या रोपो दरात पाव टक्क्यांची कपात केलीय. या कपातीनंतर एसबीआयने आपल्या व्याजदरात कपात केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!