Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पत्नीवर बळजबरी हा गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची गरज नाही : निवृत्त सर न्यायाधीश दिपक मिश्रा यांचे मत

Spread the love

पत्नीवर बळजबरी हा गुन्हा ठरवावा का, या प्रश्नाचे उत्तर देताना निवृत्त सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी  पत्नीवर बळजबरी हा गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची गरज आहे, असे  मला अजिबात वाटत नाही, असे  उत्तर देताना ते म्हणाले कि , ‘आयात केलेले विचार प्रत्येक परिस्थितीत योग्य असतात असं नाही. काही देशांनी पत्नीवर बळजबरी हा गुन्हा ठरवला म्हणून, भारतातही तो गुन्हा ठरवण्यात यावा असं मला वाटत नाही . पत्नीवर बळजबरी हा गुन्हा ठरवला तर गावखेड्यांमधील अनेक कुटुंबात अनागोंदी वाढेल. आपला देश कुटुंब संस्थेमुळं टिकून आहे. येथे आजही कौटुंबिक मूल्ये जपली जाताहेत. तसंच त्यांचा आदर आपण करतो, असेही मिश्रा म्हणाले. बेंगळुरूतील केएलई सोसायटी लॉ कॉलेजतर्फे परिवर्तनशील संवैधानिकता या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत माजी सरन्यायाधीश मिश्रा सहभागी झाले होते.  कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी यावेळी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!