Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मतदान करताना, मतदारांनी लोकशाहीने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी मतदान करण्याचे बुद्धिवंतांचे आवाहन

Spread the love

मतदारांनी मतदान करताना कुठल्या मुद्द्यांचा विचार करावा ?  विनंतीवजा आवाहन महारष्ट्रातील मान्यवर साहित्यिक , लेखकांनी मतदारांना केले  असून या निवेदनाची सर्वत्र चर्चा होत असून सामाजिक माध्यमांमध्ये हे निवेदन सर्वत्र पाठवले जात आहे . मराठीतील तीन पिढ्यांतील लेखक तसेच काही प्रकाशक व संपादक अशा एकूण शंभराहून अधिक व्यक्तींच्या सहमतीने हे निवेदन तयार करण्यात आलेले आहे. यात ज्ञानपीठ विजेते, सरस्वती सन्मान विजेते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, राज्य पुरस्कार विजेते लेखक-प्रकाशक यांचा समावेश आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, आपल्याला आपल्या लोकशाही राज्यघटनेने दिलेल्या आचार, विचार, आहार, विहार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भारत देशाचे नागरिक म्हणून आम्हाला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. त्यामुळेच या स्वातंत्र्यावर जेव्हा हल्ले झाले, त्याची गळचेपी करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, मग ते कुठलेही सरकार असो. पण गेल्या पाच वर्षांत सातत्याने माणसांच्या नागरी स्वातंत्र्यावर, व्यक्त होण्यावर हल्ले होत आहेत आणि त्यांच्या निष्ठांवर संशय घेवून त्यांना राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे, त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण केली जात आहे. या वाढत्या समाजविघातक प्रवृत्तीचा केवळ निषेध करून भागणार नाही, तर ठोस कृती करून तिचा निपटारा करण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. अशी कृती करण्याची संधी आपल्याला सार्वत्रिक निवडणुकांच्या रूपाने राज्यघटनेने उपलब्ध करून दिलेली आहे. ही संधी आता आपल्या दाराशी आलेली आहे. येत्या काही दिवसांतच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे.

मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरूया…

आम्हाला हे ठाऊक आहे की, आपले मत कुणाला द्यायचे वा द्यायचे नाही, हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या अधिकाराचा आदर राखून आम्ही मराठी लेखक सर्व सुजाण नागरिकांना असे आवाहन करतो की, आपण आपला मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरूया. आपल्या मनात दुसऱ्या धर्माबद्दल, दुसऱ्या जातीबद्दल, दुसऱ्या माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत ते ओळखूया, अशा द्वेषभावनांना पोसणारे आणि हिंसक कृत्ये करून समाजात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना अभय देणारे राजकारणी कोण आहेत ते ओळखूया, जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन राष्ट्रवादाचा फुगा फुगवण्यामागचे राजकारण जाणून घेऊया, आणि अशा शक्तींना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देवूया. ती वेळ आता आलेली आहे. आपली लोकशाही आणि तिने दिलेले स्वातंत्र्य शेवटी आपल्यालाच जपायचे आहे, त्याची बूज राखायची आहे. कारण त्यातच आपले आणि समाजाचे स्वास्थ्य दडलेले आहे.

या निवेदनावर  भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, जयंत पवार, राजीव नाईक, येशू पाटील, प्रदीप चंपानेरकर, प्रशांत बागड, अरुण खोपकर, रंगनाथ पठारे, चंद्रकांत पाटील, शफाअत खान, रामदास भटकळ, लैला भटकळ, शांता गोखले, हरिश्चंद्र थोरात, श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, अवधूत डोंगरे, नीरजा, रणधीर शिंदे, प्रज्ञा दया पवार, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, हेमंत दिवटे, नितीन रिंढे, मंगेश नारायणराव काळे, प्रवीण दशरथ बांदेकर, संध्या नरे पवार, हरी नरके, संजय पवार, अरुणा सबाने, माया पंडित, अशोक राणे, महेश केळुसकर, अशोक मुळ्ये, सतीश तांबे, सतीश काळसेकर, आसाराम लोमटे, किरण गुरव, मुकुंद टाकसाळे, गणेश विसपुते, वसंत पाटणकर, मिलिंद मालशे, नागनाथ कोत्तापल्ले, विजय चोरमारे, उदय रोटे, संतोष पद्माकर पवार, अविनाश गायकवाड, महेंद्र भवरे, मंगेश बनसोड, श्यामल गरुड, मोनिका गजेंद्रगडकर, कल्पना दुधाळ, प्रेमानंद गज्वी, अजय कांडर, श्रीधर नांदेडकर, अशोक बागवे, अरुण शेवते, संध्या गोखले, मिलिंद चंपानेरकर, दत्ता पाटील, प्राजक्त देशमुख, सुमती लांडे, धर्मकीर्ती सुमंत, मकरंद साठे, आशुतोष पोतदार, अतुल पेठे, रवींद्र लाखे, मनस्विनी लता रवींद्र, ओंकार गोवर्धन, दा. गो. काळे, रमेश इंगळे उत्रादकर, किरण यज्ञोपवीत, प्रतिमा जोशी, मुकुंद कुळे, संतोष शेणई, गणेश मतकरी, विजय तांबे, प्रणव सखदेव, गणेश कनाटे, प्रशांत पवार, शेखर देशमुख, राजन बावडेकर, बलवंत जेऊरकर, फेलिक्स डिसोझा, अजित अभंग, सुनील अवचार, मोहन शिरसाट, सुदाम राठोड, शुभांगी थोरात, दिलीप जगताप, बालाजी सुतार, रफिक सूरज, चंद्रकांत बाबर, शिवाजी गायकवाड, अनुजा जगताप, नीता कुलकर्णी, अविनाश कदम, युगंधर देशपांडे, हेमंत कर्णिक, स्वप्नील शेळके, प्रसाद कुमठेकर, आशिष पाथरे, सत्यपालसिंग आधारसिंग रजपूत, अतुल कहाते आदी मान्यवर साहित्यिक, लेखकांचीनावेआहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!