Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : भाजपचा जाहीरनामा : राम मंदिर , जम्मू-काश्मीरमधून ३५-अ, शेतकऱ्यांच्या उन्नतीवर पुन्हा कायम !!

Spread the love

लोकसभा निवडणुकीत  भाजपने पुन्हा पुढील पाच वर्षाच्या जाहीरनाम्यात राम मंदिरा मुद्दयाला हात घालतानाच जम्मू-काश्मीरमधून ३५-अ कलम हटविण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भाजपच्या संकल्पपत्राचे  प्रकाशन करण्यात आले.  भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपाकडून हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपाने जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शाह, भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या.

शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीयांना समोर ठेवून हा जाहीरनामा तयार करण्यात आला असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे तर काँग्रेसने हे संकल्पपत्र नसून एका व्यक्तीची “मन कि बात ” असल्याची टीका केली आहे . या संकल्पपत्रातील दहा ठळक वैशिष्ट्यांवर टाकलेली ही नजर.

काय  आहे या संकल्पपत्रात….
 भाजपच्या या संकल्प पत्रात राष्ट्रवादाला प्राधान्य प्राधान्य देण्यात आले असून दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण,  समान नागरी कायदा लागू करणार, घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न करणार,  नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून लागू करणार ,  लवकरात लवकर सौहार्दपूर्ण वातावरणात राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न करू,  जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३५-अ हटविण्याचा प्रयत्न करू,  शेतकऱ्यांना सरसकट ६ हजार रुपये देऊ, सर्व छोट्या शेतकऱ्यांना वयाच्या साठीनंतर पेन्शन देणार,  क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या १ लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर ५ वर्षापर्यंत व्याज आकारणार नाही,  देशातील छोट्या दुकानदारांना वयाच्या साठीनंतर पेन्शन देणार,  प्रत्येक कुटुंबाला पक्कं घर देऊ, जास्तीत जास्त ग्रामीण कुटुंबाला एलपीजी गॅस देऊ,  आयुष्यमान भारतच्या १.५ लाख हेल्थ सेंटर उघडणार

शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस….

शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार, सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार, १ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर ५ वर्षांपर्यंत कोणतंही व्याज आकारण्यात येणार नाही,  ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेंशन सुरु करणार, शेतीमधील उत्पादन वाढवण्यासाठी २५ लाख कोटींची गुंतवणूक करणार, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळणार, आयात निर्यातीवरील करावर नियंत्रण मिळवून शेतमालाचा व्यापार अधिक सोयीस्कर करणार, चांगल्या दर्जाचे आणि परवडणाऱ्या दरात बियाणे उपलब्ध करुन देणार, तेलबियांसंदर्भात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गोदामे आणि वाहतूक यंत्रणा उभारणार ,
ऑरगॅनिक शेतीला प्रोत्साहन देणार, ऑरगॅनिक शेतीचे श्रेत्र २० लाख हेक्टरपर्यंत वाढवणार,  ऑरगॅनिक शेतीमधील शेतमाल विकण्यासाठी इ-कॉमर्स पोर्टल सुरु करणार,  राष्ट्रीय मध योजना राबवणार, मध उत्पादन दुपट्टीने वाढवण्यासाठी यंत्रणा उभारणार,  सिंचनाखालील शेतीचे क्षेत्र वाढवणार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत संपूर्ण देशातील शेतजमीन सिंचन क्षेत्राखाली आणणार, शेतमाल विकण्यासाठी सहकारी संस्थांना मदत देणार, फळे, भाज्या आणि दूध उत्पादानांसाठी मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांना बाजारापेठा उपलब्ध करुन देणार,  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन लॉन्च करणार, शेतमालाचे दर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारणार, आर्टिफिशिय इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, डेटा अॅनलिसीसच्या माध्यमातून देशात कृषिशास्त्रज्ञ घडवणार, सौरउर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कमाई वाढवण्यासाठी विशेष योजना राबवणार, शेतजमीनींच्या सर्व नोंदणी डिजीटल पद्धतीने करणार, कामधेनू योजनेअंतर्गत पशूसंवर्धनासाठी शेतकऱ्यांना मदत करणार, गुरांच्या आरोग्यासाठी विशेष योजना राबवणार, गुरांना योग्य प्रमाणात चारा मिळण्यासाठी उपाययोजना करणार, मच्छिमारांसाठी १० हजार कोटी रुपयांची ‘मत्स संपदा योजना’ राबवणार,
साश्रय योजनेअंतर्गत बेघरांना २०२२ पर्यंत घरे उपलब्ध करुन देणार, ‘जल जिवन मिशन’अंतर्गत ‘नल से जल’ योजना राबवणार, २०२४ पर्यंत ‘नल से जल’ योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करणार, सुचना से सशक्तीकरण मोहिमेअंतर्गत २०२२ पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणार, सडक से समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती सुधारणार

अशा विविध योजनांचा पाऊस भाजपने आपल्या जाहीर नाम्यात पाडला आहे.यावर किती शेतकरी विश्वास ठेवतील प्रश्नच आहे. भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यावर विचार करुन ‘संकल्पपत्र’ तयार करण्यात आले आहे.   भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास 7500 सूचना पेट्या, 300 रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!