Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नरेंद्र मोदी यांनी केलेली व्यक्तिगत टीका राष्ट्रवादीचे  नेते  शरद पवाराना आवडली नाही, म्हणाले भेटल्यावर विचारेन ….

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली व्यक्तिगत टीका राष्ट्रवादीचे  नेते  शरद पवार यांना आवडलेली नाही पुन्हा एकदा मोदींना राजकारणचा पाठ पढवताना पवार म्हणाले कि , राजकारणात संघर्ष असावा परंतु वैयक्तिक संघर्ष  नसावा. माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा . मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारेल की माझ्या घरात भांडणे आहेत, हे तुम्हाला कसे कळले. माझं घर भरलेल आहे तुमचं घर कस आहे असही मी त्यांना विचारेल.  पाटस ( ता. दौंड ) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, माझं बोट धरुन राजकारणात येणाऱ्या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असे मोदी म्हणाले.  राजकारणात  वैयक्तिक टीका करु नये हा राजकारणाचा नियम आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी नियोजन करणे काळाची गरज आहे. निवडणुका येतील आणि जातील माञ दुष्काळात जनता होरपळता कामा नये. केंद्र  आणि राज्यातील भाजपा आणि मिञ पक्ष सरकार भुलथापाचे सरकार ठरले. बारामतीत फडणवीस यांनी सांगीतले की राज्यात भाजपा सरकार आल्यास पहिल्याच मंञीमंडळात धनगर  समाजाला आरक्षण देऊ, परंतु अद्याप या सरकारने आरक्षण दिले नाही. शेतकरी भरडतोय महागाई वाढली तेव्हा भविष्यात फसव्या विचाराचे प्रतिनिधी केंद्रात आणि राज्यात जाता कामा नही असे शेवटी पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!