Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात अवतरले दोन राहुल गांधी आणि एक गांधी

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीहुन केरळच्या वायनाड मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवायला काय गेले वायनाड मतदार संघात तीन तीन गांधी प्रगट  राहुल गांधी यांना डोकेदुखी तर झालीच आहे पण  उमेदवारीमुळे लोकांचेही चांगलेच मनोरंजन होत आहे. कारण याठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात तीन असे उमेदवार आहेत की ज्यांची नावं राहुल गांधींच्या नावाशी मिळती-जुळती आहेत.

Advertisements

वायनाडमधून के ई राहुल गांधी, अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे सदस्य कोयंबतूरचे के के राहुल गांधी आणि त्रिसूरचे के एम शिवप्रसाद गांधी हे निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन राहुल गांधी मैदानात उतरल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. चौघांच्या नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा फटका काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी बसण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

वायनाड हा मतदारसंघ तामिळनाडू, कर्नाटक व केरळच्या सीमेवर आहे. दक्षिण भारतात काँग्रेसची हवा निर्माण करण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांनी या मतदारसंघाची निवड केल्याचं बोललं जात आहे. वायनाडमध्ये के ई राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे शिक्षण एम.फिल पर्यंत झाले आहे. ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांच्याकडे पाच हजार रुपये रोख रक्कम आणि बँकेत फक्त ५१५ रूपये आहे. तर दुसरे उमेदवार के. राहुल गांधी हे पेशाने पत्रकार आहेत, तर त्यांची पत्नी डॉक्टर आहे. के राहुल गांधी यांचं उत्पन्न जवळजवळ दोन लाख रूपये आहे. तिसरे उमेदवार के एम शिवप्रसाद गांधी संस्कृतचे शिक्षक आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!