काँग्रेसला देशभक्ती शिकवायला निघालेत काही लोक !! नरेंद्र मोदींचे नाव न घेता सोनिया गांधी यांची टीका

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून प्रारंभी दुर राहिलेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही आता प्रचार उडी घेतली आहे . दिल्लीतील एका प्रचार सभेत सोनिया म्हणाल्या कि, काही लोक देशभक्तीची नवी व्याख्या आम्हाला शिकवू पहात आहेत. या देशात सुरुवातीपासूनच विविधता आहे, तरीही हा देश एक आहे. मात्र आता हे वैविध्य न स्वीकारणाऱ्यांना देशभक्त म्हटले जाते आहे. आम्ही काय खावं? काय कपडे घालावेत? हेदेखील आम्हाला शिकवलं जातं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे. लोकांची मनमानी आम्ही सहन करावी अशी अपेक्षा ठेवली जाते आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता सोनिया गांधींनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Advertisements

देशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांना अनुल्लेखाने मारीत सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे .  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधी सातत्याने प्रत्येक सभेत घराण्यावर टीका करताना दिसत आहे.तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी पवारांवरही टीका केली. शरद पवारांनीही  त्यांच्या  टीकेला अत्यन्त टोकदार प्रत्युत्तर दिले. आता सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसला देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जाते आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

Advertisements
Advertisements

देशात गोमांसाच्या मुद्द्यावरूनही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. याकडेही सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले. आम्ही काय खायचे प्यायचे? कपडे कसे परिधान करायचे हेदेखील आता काही ठराविक लोक ठरवणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे असेही त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. आम्ही ठराविक वर्गाची मनमानी का सहन करायची असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

आपलं सरकार