युरोपियन रेनो इंडियाची नवीन एसयुव्ही कॅप्चर कार भारतात दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपीयन ऑटोमोटीव्ह ब्रँड असून त्याने स्टाईलिश एसयुव्ही – कॅप्चर नव्याने लॉन्च केली. ही नवीन कार भारतीय प्राधिकरणाने निश्चित केलेल्या प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनुरूप आहे. नवीन  रेनोच्या सर्वच वेरीयंटमध्ये इतर अनेक अत्याधुनिक तंत्रासह अनेक अॅक्टीव्ह व पॅसिव्ह सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. कॅप्चरच्या लॉन्चसोबत रेनोने अभिनव वेहिकल क्लास निर्माण केला, ज्यामध्ये त्याचे आकर्षक लक्षवेधक डिझाईन, दर्जेदार वैशिष्ट्ये आणि कल्पक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

Advertisements

नवीन कोऱ्या रेनो कॅप्चरमध्ये अॅक्टीव्ह व पॅसिव्ह सुरक्षा वैशिष्ट्यांसह ड्यूएल एअरबॅग्ज, अँटीलॉक-ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) समवेत इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन (ईबीडी) व ब्रेक असिस्ट, स्पीड अलर्ट, रिअर पार्किंग सेन्सर, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर, हाईट अजस्टेबल सीट-बेल्ट, लटेरल आयसोफिक्स – चाईल्ड सीट अंकर, रीयर डीऑफॉगर, रीयर वायपर आणि वॉशर व स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक देण्यात आले आहे. ही सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये नवीन रेनो कॅप्चरच्या सर्वच व्हर्जन्समध्ये उपलब्ध आहेत.
रेनो कॅप्चर एक पाऊल पुढे जाऊन ड्रायव्हिंग अनुभव देतो, जो एक अद्ययावत संकल्पना युक्त आहे, रेनोची डिझाईन अप्रोच सुलभतेने कार आणि ड्रायव्हरसोबत कनेक्ट होते. रेनो कॅप्चर आधुनिक हायटेक सोल्युशनने सज्ज आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग कनेक्टेड, सुलभ आणि आरामदायक बनते. यामध्ये इन्फीनीटी इन्स्ट्रुमेन्ट क्लस्टरचा समावेश आहे, जो ड्रायव्हरला कॉकपिट अनुभव देतो. वापरकर्ता-स्नेही आणि हुशार 17.64सीएम टचस्क्रीन मीडियानाव इवोल्यूशन  सोबत रियर पार्किंग कॅमेरा  यासोबत नव्याने सादर करण्यात आलेले वॉईस रेकगनेशन, अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले सादर करण्यात आले आहे. ग्राहकांना आता त्यांच्या स्मार्टफोन्सवर गुगल मॅप्सच्या साह्याने अद्ययावत नेव्हिगेशन उपलब्ध झाले आहे. यामध्ये इको गाईडही दिले आहे – ही एक अशी सिस्टीम आहे, ज्यात ड्रायव्हींग पॅटर्नवर लक्ष ठेवता येते आणि कार्यतप्तरता वाढण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत.
रेनो कॅप्चर ची दोन्ही, पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन पर्यायात उपलब्ध आहे. पेट्रोल पर्यायाकरिता 16 वॉल्व 4 सिलेंडर 1.5 एल एच4के पेट्रोल इंजिनयुक्त 5 स्पीड मॅन्युएल गियरबॉक्स देण्यात आले आहे, जे  4 हजार आरपीएमवर 142 एनएम टोर्क तर 5600 आरपीएमवर 106 पीएस निर्माण करते. पेट्रोल पॉवरट्रेन 13.87 केएमपीएल (एआरएआय प्रमाणित) मायलेज देते.
तर डिझेल वर्जन 1.5 एल के 9के डिझेल इंजिन (कॉमन रेल इंजेक्शन) सोबत 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स 3850 आरपीएमवर 110 पीएस कमाल शक्ती तर 1750 आरपीएमवर 240 एनएम सर्वोच्च टोर्क देते. डिझेल पॉवरट्रेन 20.37 केएमपीएल (एआरएआय प्रमाणित) मायलेज देते.
रेनो कॅप्चरच्या सर्वच वेरीयंटमध्ये स्टँडर्ड ऑफरिंग असून त्यात 50 हून अधिक सर्वोत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. प्लॅटीनमध्ये अल्ट्रा-प्रीमियम ब्लॅक आणि आयव्हरी इंटेरीयर आहे, त्यासोबतच विरुद्ध रंगसंगती अॅक्सेंट आणि ब्लॅक लेदर्ड सीट्स आहेत. अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या इर्गो डिझाईनच्या सीट 6 प्रकारे अॅडजस्ट करता येतात. त्यामुळे याच्या दोन्ही पुढे-मागील जागेत जास्त लेगरूम मिळते. यामध्ये हाय ड्रायव्हींग पोजीशन उपलब्ध असल्याने सभोवताली खिडकीबाहेरची विहंगम दृश्ये पाहता येतात. कॅप्चरमध्ये अतुलनीय आराम मिळतो. त्याशिवाय सामान ठेवण्यासाठीची जागा विचारपूर्वक सुलभता लक्षात घेऊन देण्यात आली आहे. 392 लिटरबूट 1352 लिटर्सपर्यंत वाढवणे शक्य आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार