Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षाला मतदान न करण्याचे आवाहन

Spread the love

देशभरातील जवळपास ६०० नाट्यकर्मी मोदी सरकार आणि मित्रपक्षाविरोधात एकवटले आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला मतदान न करण्याचं आवाहन नाट्यकर्मीनं केलं आहे. या कलाकारात नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक- शाह, कोंकणा सेन शर्मा, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा समावेश आहे. प्रेम, समता, न्याय बंधुता यासाठी मतदान करा असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे. यापूर्वी देशातल्या १०३ चित्रपट निर्मात्यांनी भाजपविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. एका वेबसाइटद्वारे त्यांनी हे आवाहन केलं होतं. यानंतर काही दिवसांतच ६१६ नाट्यकलाकार एकत्र येत त्यांनी भाजपला मत न करण्याचं आवाहन केलं आहे.

‘द्वेष आणि हिंसेचं राजकरण आता खेळलं जात आहे. मोदी जे देशाचे नेते मानले जातात त्यांनी पाच वर्षांपूर्वीच देशांतील कोट्यवधी लोकांचं आयुष्य आपल्या धोरणांनी उद्ध्वस्त केलं आहे. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा, चर्चा करण्याचा, विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याशिवाय लोकशाही काम करत नाही. पण, आताच्या सरकारनं या सर्व गोष्टी पायदळी तुडवल्या आहेत’, असं या कलाकारांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.  या पत्रकावर नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक- शाह, कोंकणा सेन शर्मा, दिग्दर्शक अनुराग कश्यप , अमोल पालेकर, अभिषेक मजुमदार यांसारख्या कलाकरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे पत्रक विविध १२ भाषांत प्रसारित करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!