Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडे काय हाय काय ? आन नाय काय ? देश जाणून घेऊ इच्छितो ….

Spread the love

लोकसभेच्या निमित्ताने कागदोपत्री का होईना कोणत्या नेत्याकडे किती मालमत्ता आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच तशीच ती राहुल गांधी यांच्या बद्दलही आहेच . काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड आणि अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा खुलासा केला आहे. राहुल गांधींच्या संपत्तीत 5 कोटींची वाढ झाली आहे. 2019ला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधींकडे 15 कोटींची स्थावर आणि जंगम संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

या संपत्तीत समावेश असलेल्या दिल्लीतल्या मेहरोलीमध्ये एक फॉर्म हाऊसमध्ये राहुल गांधींची प्रियंका गांधींबरोबर भागीदारी आहे. केरळच्या वायनाड जागेवरून लोकसभा निवडणूक लढणाऱ्या राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, त्यावेळी ही माहिती दिली होती. राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, त्यांच्याजवळ पाच कोटी 80 लाख 58 हजार 779 रुपये स्थावर संपत्ती आहे. या संपत्तीत 40 हजार रुपयांची रोख, विविध बँक खात्यांमध्ये एकूण 17लाख 93 हजार 693 रुपये, शेअर आणि बाँडमध्ये पाच कोटी 19 लाख 44 हजार 682 रुपये आणि पीपीएफ खात्यात 39 लाख 89 हजार 037 रुपयांचा समावेश आहे. याशिवाय 2 लाख 91 हजार 367 रुपयांचे दागिने आहेत. राहुल गांधींकडे 10 कोटींची जंगम मालमत्ता आहे.

8 कोटी 75 लाख 70 हजार रुपयांचं गुरुग्राममध्ये 5838 वर्ग फुटांची दोन दुकानं आहेत. तसेच दिल्लीतल्या छतरपूरमध्ये बहिणी प्रियंका गांधींच्या 50 टक्के भागीदारीबरोबर एकूण 1 कोटी 32 लाख 48 हजार 284 रुपयांचं फार्म हाऊस आहे. एकूण मिळून जंगम मालमत्ता 10 कोटी आठ लाख 18 हजार 284 रुपये आहे. राहुल गांधींनी स्वतःची आई सोनिया गांधींकडून पाच लाख रुपयांचं खासगी कर्ज घेतलं आहे. तसेच याशिवाय भाडेकरूंकडून मिळालेली 67 लाख एक हजार 904 रुपयांची रक्कम जमा आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!