Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युएईचा सर्वोच्च ‘झायद मेडल’ पुरस्कार जाहीर

Spread the love

युएईचा सर्वोच्च मानला जाणार ‘झायद मेडल’ हा पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. स्वत:हून पुढाकार घेऊन भारत आणि युएईमधील आंतरराष्ट्रीय संबंध दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार मोदींना देण्यात येतो आहे.झायद मेडल हा पुरस्कार युएईचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना या पुरस्काराने गौरवण्यात येतं. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग, ग्रेट ब्रिटची राणी एलिझाबेथ३ यांना याआधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये युएई आणि भारतातले संबंध सुधारण्यासाठी, आर्थिक देवाण-घेवाण वाढवण्यासाठी ,मैत्रीपूर्ण नातं संस्थापित करण्यासाठी मोदींनी भरपूर मेहनत घेतली आहे. इतिहासात कधीही नव्हते इतके चांगले आंतरराष्ट्रीय संबंध भारत- युएईमध्ये प्रस्थापित झाले आहेत. यामुळेच हा सन्मान नरेंद्र मोदींना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती खुद्द युएईचे युवराज मुहम्मद बिन झायेद अल नाहायन यांनी ट्विट करून दिली आहे. मागच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी नाहायन भारताचे प्रमुख अतिथीही होते.  भारताला तेल निर्यात करणारा युएई पाचवा मोठा देश आहे. भारत- युएईमधील व्यापाराने नुकताच ५० अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे.

2 thoughts on “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युएईचा सर्वोच्च ‘झायद मेडल’ पुरस्कार जाहीर

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!