Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राच्या दुसऱ्या प्रचार सभेतही मोदींची शरद पवारांना खेटा खेटी , राष्ट्रवादींना दाखवली “तिहार” तुरुंगाची भीती !!

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात दुसरी प्रचार सभा घेतली आणि या सभेतूनही राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. ‘राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप सध्या उडाली आहे. झोप उडण्याचे कारण तिहार कारागृहात बंदिस्त आहे. जो आत गेलाय तो चौकशीत सगळं काही बोलून गेला तर आपलं काय होईल, याची भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे’, असे नमूद करतानाच या सगळ्याचा पर्दाफाश होणारच आहे. तो दिवस आता दूर नाही, असा सूचक इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. पंतप्रधानांनी कुणाचेही नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला लक्ष्य केलं.

पंतप्रधानांनी वर्धा येथे महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा घेतली. या सभेला अपेक्षित गर्दी झाली नव्हती मात्र गोंदियातील सभेत भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गोंदिया-भंडारा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्यात थेट लढत होत असून मोदींनी या सभेतही काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसने जो देशविरोधी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याच्याशी शरद पवार सहमत आहेत का, असा सवाल करताना पवारांनी आपले तोंड बंद का ठेवले आहे, अशी विचारणा मोदींनी केली.

पंतप्रधानांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. हा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कारस्थानांचं योजनापत्र असल्याचा निशाणा मोदींनी साधला. काँग्रेसने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे खच्चीकरण करण्याचा डाव आखला आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणा ज्या प्रवृत्तींनी दिल्या त्यांना खतपाणी घालण्याचेच काम काँग्रेस करत आहे, अशी तोफही मोदींनी डागली. आपलं राजकीय अस्तित्व संपेल या भीतीने ‘महामिलावटी’ आघाडीतील लोक या चौकीदाराला शिव्या देत आहेत. माझ्या कामांपेक्षा माझं नाव त्यांना खुपतं आहे. आधी ‘चहावाला’ हा माझा इतिहास त्यांच्या पचनी पडला नाही आणि आता ‘चौकीदार’ या शब्दाने त्यांची आदळआपट होते आहे, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!