Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद लोकसभा : सुभाष झांबड यांचे काँग्रेसचे तिकीट आणि आ. अब्दुल सत्तार यांचे मुख्यमंत्र्यांच्या दरबारातील ” सत्तार वादन ” !!

Spread the love

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा . रावसाहेब दानवे रात्रीच्या विशेष विमानाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना….

औरंगाबाद मध्ये निर्माण झालेल्या काँग्रेसच्या वादाच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी नको नको म्हणताना, आ. अब्दुल सत्तार यांनी सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळताच कमालीची नाराजी दाखवीत औरंगाबादमधून काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकले आहेत.  त्यांच्या या वर्तनाविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटत आहे.  तर मतदारांचे आणि विरोधकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे . या सर्व पार्श्वभूमीवर जालना आणि औरंगाबादच्या लोकसभेत काँग्रेसचे बंडखोर आ . अब्दुल सत्तार यांचे ” सत्तार वादन ” भाजपच्या  झाले असल्याने काल रात्री विशेष विमानाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी घेऊन उडाले आहेत . अर्थात शेवटी अब्दुल सत्तार यांचे मुख्यमंत्र्यांच्या  दरबारातील अब्दुल सत्तार यांचे “सत्तार वादन”त्यांच्या आणि सेनेच्या पत्थ्यावर पडेल कि नाही हे लवकरच समजेल.

खरे तर  जे अब्दुल सत्तार शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अर्जुन खोतकर यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आणि त्यांना औरंगाबाद लोकसभा लढविण्यासाठी आग्रही होते इतकेच नव्हे तर खा . खैरे यांना पाडण्यासाठी औरंगाबाद लोकसभा लढविणार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांना काँग्रेस मध्ये आणण्याची भाषा करणारे तेच अब्दुल सत्तार आता पक्षाला फाट्यावर मारत भाजपशी जवळीक वाढवताना दिसत आहेत. झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे कळताच त्यांनी मध्यरात्री मुंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली परंतु त्यांच्या या भेटीची आणि त्यांनी दिलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची काँग्रेस श्रेष्ठींनी कोणतीही दाखल घेतली नाही, त्यामुळे अब्दुल सत्तार अधिकच खट्टू झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी औरंगाबादेत तळ ठोकून काँग्रेसशी असलेले सर्व नाते  तोडून त्यांनी गांधीभवनात ठेवलेल्या आपल्या खुर्च्याही उचलून नेल्या. औरंगाबाद लोकसभा लढविण्यासाठी त्यांनी त्यांच्या चाहत्यांची बैठक घेतली खरी पण त्यांनी अपक्ष लढण्यास सत्तर यांना विरोध दर्शवून पक्षाच्या तिकिटावरच लढा असे संकेत दिले त्यामुळे अब्दुल सत्तार यांची आणखीच पंचाईत झाली. तरीही त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करीत अखेर पुन्हा त्यांनी भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे.

अशोक चव्हाण काय म्हणाले होते ?

मुळात  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले आ. अब्दुल सत्तार सिल्लोडचे आमदार आहेत. त्यांचा विधानसभा  मतदार संघ लोकसभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदार संघात येतो. परंतु आपले औरंगाबाद येथे घर असल्याने आपण औरंगाबादमधूनच लोकसभा लढविण्यास इच्छुक होतो असा त्यांचा दावा आहे तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दरम्यानच्या काळात प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले होते कि, नांदेडच्या बैठकीत स्वतः अब्दुल सत्तार आणि डॉ. कल्याण काळे यांनी आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले होते . तर  काँग्रेसचे तिकीट मिळालेले सुभाष झांबड यांनी सांगितले कि , अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने आपलेही नाव औरंगाबाद इच्छुकांच्या यादीत पक्ष नेत्यांकडे पाठवले होते त्यामुळे आपण जिल्हाध्यक्षांना बायपास करून लोकसभेचे तिकीट मिळवले हे आ . अब्दुल सत्तार यांचे म्हणणे खरे नाही, तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर आपली काहीही हरकत नाही, परंतु अब्दुल सत्तार यांचे समाधान झाले नाही परिणामी त्यांनी आपला बंडाचा झेंडा अद्याप खाली तर ठेवलाच नाही या उलट त्यांनी आता काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेण्याचे पक्के ठरवले आहे.

विशेष म्हणजे  आ. अब्दुल सत्तार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत परंतु महाराष्ट्रातील तिकिटे वाटताना अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षश्रेष्टींनीं विश्वासात घेतले नाही असेही अब्दुल सत्तार यांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद लोकसभेसाठी सत्तर यांनी बंडखोरी करीत काल  अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .  दरम्यान बुधवारी रात्री दहा वाजता आमदार सत्तार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकत्र दिसून आले. रात्री साडे दहा वाजता एकाच  विशेष विमानात एकत्र बसून सत्तार आणि दानवे हे मुंबईकडे रवाना झाले असल्याचे वृत्त सरकारनामाने दिले आहे.

सरकारनामाच्या वृत्तानुसार चिकलठाणा विमानतळाच्या व्हीयआपी कक्षात सत्तार आणि दानवे यांच्यात  अर्धा तास गुप्त बैठक झाली. या बैठकी दरम्यान जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचीही उपस्थिती होती. बंद खोलीत अर्धा तास चर्चा करून हे दोघे विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईच्या विमानतळाच्या धावपट्टीचे कामकाज सुरु असल्यामूळे त्यांचे विशेष विमान उतरण्यासाठी रात्री सव्वा आकाराची वेळ देण्यता आली होती. त्यानुसार त्यांचे विशेष विमान औरंगाबादेतून टेकऑफ झाले.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे टिकीट आमदार सुभाष झांबड यांना दिल्यानंतर आमदार सत्तार यांच्या नाराजी बाहेर आली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिला. काही दिवसापुर्वी आमादार सत्तार यांनी जलसंपदा गिरीष महाजन यांच्या उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भेट घेतली होती. त्याच वेळी सत्तार भाजप मध्ये जाणार असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. बुधवारी प्रत्यक्षात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी एकत्र येत एका विशेष विमानाने मुंबईकडे कुच केले. ते मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासह औरंगाबादला परत येतानाही हे दोघे सोबत येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

आ . अब्दुल सत्तार यांना भाजपने जवळ करण्याचे कारण…

आ . अब्दुल सत्तार यांना भाजपने जवळ करण्याचे कारण उघड आहे. १. सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ खा. दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांच्याशी जवळीक वाढली तर सिल्लोड मधून ते खा. दानवे यांना लीड मिळवून देऊ शकतात म्हणून त्यांना सत्तार यांची दोस्ती झाल्यास नक्कीच हवी आहे. सिल्लोड मध्ये त्यांनी मदत केली तर त्यांच्यावर नाराज असलेले आमदार आणि मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून डाग फटका झाला तरी त्याही कसर अब्दुल सत्तार भरून काढू शकतात असा दानवे यांना विश्वास आहे. याच कारणावरून अर्जुन खोतकर यांनाही सत्तार यांची दोस्ती हवी होती परंतु त्यांचे लोकसभा लढविण्याचे प्रयत्न आणि खासदार होण्याचे आणि दानवेंना चारी मुंड्या चिट करण्याचे स्वप्न धुळीस  मिळाले आणि दानवेंच्या विरोधात काढलेली तलवार त्यांना   वरिष्ठांच्या दबावामुळे म्यान  करावी लागली. आता त्यांची दोस्ती  रावसाहेब दानवे यांना हवी आहे.

२.  अब्दुल सत्तार यांच्या नाराजीचा आणि भाजपच्या दोस्तीचा फायदा औरंगाबादचे सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनाही आपसूकच होऊ शकतो पण त्यांनी त्यासाठी अपक्ष म्हणून लढणे गरजेचे आहे. ते उभे राहिले तर मुस्लिम मतदान अनुचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांच्या विभागले जाऊ शकते आणि त्याचा थेट फायदा खा. चंद्रकांत खैरे यांनाही होऊ शकतो. म्हणून अब्दुल सत्तार यांचे ” सत्तारवादन” भाजप-सेनेच्या फायद्याचे आहे.

खा . खैरे  यांचा निर्णय मतदारांवर…

विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या पुनश्च विजयासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. दानवे यांचा उमेदवारी अर्जभरण्यासाठी ते स्वतः रामदास आठवले यांना घेऊन जालना शहरात आले होते. दानवे यांच्यावर असलेला अर्जुन खोतकर यांचा रुसवाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना पुढे करून काढला आहे परंतु केवळ खा. चंद्रकांत खैरे यांना पाडण्यासाठी आपण औरंगाबाद लोकसभेच्या मैदानात उतरलो आहोत असे म्हणणारे रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारी मागे घेण्या विषयी मात्र ना उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी !!जेथे प्रश्न प्रतिष्टेचा आहे तेथे मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपली शक्ती पणाला लावली हे मुख्यमंत्र्यांच्या बाजूने जालना येथे दिसले तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांना हटविण्यावरून महाराष्ट्राने बघितले. त्यामुळे जणू भाजप आणि सेनेने खा . चंद्रकांत खैरे यांचा निर्णय मतदारांवरच सोपवला आहे. नाही म्हणायला त्यांचा अर्ज भरताना सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरेंना पक्षाने पाठवले होते इतकेच.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!