Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Facebook : काँग्रेस बरोबरच पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवरही फेसबुकची कारवाई 

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित  सुमारे 687 फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटविल्याचा आनंद भाजप व्यक्त करीत नाही तोच  फेसबुकनेआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई केली असल्याचे वृत्त “रॉयटर” या वृत्त संस्थेने दिले आहे . वृत्तात  , नमो अॅपशी निगडित असलेल्या सिल्व्हर टच या आयटी कंपनीशी संबंधित असलेली १५ पेज आणि अकाऊंट्स फेसबुकवरूनहटवण्यात आली आहेत.

Advertisements

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून, त्यांच्याकडून खोट्या अकाऊंट्स आणि पेजेसचा वापक करून एकमेकांविरोधात फेक न्यूज आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर फेसबूककडून ही कारवाई केली जात आहे. या कारवाईदरम्यान,  नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर ही कारवाई करताना ही अकाऊंट्स फेसबूकवरून हटवण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!