Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि तीन पोलिसांचे निलंबन , पिंपरी-चिंचवड पोलिस पोलीस आयुक्तांची कारवाई

Spread the love

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर.के.पद्मानाभन यांनी चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचार्‍यांना निलंबीत केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलिस कर्मचारी दत्तात्रय माळवदकर आणि राजेंद्र किरवे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहे. त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी शनिवारी रात्री उशिरा दिले. सहाय्यक निरीक्षकासह तिघांना निलंबीत केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ३ पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ नियंत्रण कक्षाशी संलग्‍न करण्यात आले आहे.
चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. त्याबाबतची तक्रार देण्यासाठी मुलीचे वडिल अनेकवेळा चिखली पोलिस चौकीत गेले. पोलिस चौकीत हजर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी पिडीत मुलीच्या वडिलांनी थेट पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची भेट घेवुन हकीकत सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्‍तांनी या प्रकरणाची चौकशी केली.  या चौकशीत पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हालगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस आयुक्‍तांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबीत केले तर इतर ३ पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ कंट्रोल रूमला संलग्न करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!