Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : भीम आर्मीचे चंद्रशेखर भाजपचे गुप्तहेर, त्याला मतदान करू नका : मायावती

Spread the love

भीम आर्मीचे चंद्रशेखर भाजपचे गुप्तहेर, असल्याचा आरोप बसपा नेत्या मायावती यांनी ट्विट करून केला आहे .  भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांनी वाराणासीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर बसपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर हे भाजपचे गुप्तहेर असल्याचा खळबळजनक आरोप बसपा प्रमुख मायावती यांनी केला आहे. मायावती यांनी ट्विट करून हा सनसनाटी आरोप केला.

मायावती यांनी पुढे म्हटले आहे कि , दलितांच्या मतांची विभागणी करून मोदींचा विजय सोपा करण्यासाठीच भाजपने चंद्रशेखर यांना निवडणुकीत उभं केलं आहे. त्याआधी हेरगिरी करण्यासाठी चंद्रशेखर यांना बसपामध्ये पाठवण्याचा भाजपने प्रयत्न केला होता. मात्र त्यांचं हे षडयंत्र अयशस्वी ठरल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. षडयंत्राचा भाग म्हणून भाजपनेच भीम आर्मीची स्थापना केली आहे. या संघटनेच्या आडून भाजप दलितविरोधी राजकारण करत आहे. अहंकारी, बेलगाम आणि जातीयवादी भाजपाला सत्तेतून हटविण्यासाठी तुमचे एक-एक मत महत्त्वाचे असून तुमचं मत वाया जाऊ देऊ नका, असं आवाहनही मायावती यांनी केलं आहे. मायावती यांनी यापूर्वीही भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर भाजपचे हस्तक असल्याचा आरोप केला होता.

चंद्रशेखर आझाद यांनी मायावती यांना “बुवा” म्हटले होते त्यावर “मै किसी कि बुवा नही हू” असे प्रत्युत्तर मायावतींनी दिलेहोते. प्रारंभापासूनच मायावती यांनी चंद्रशेखर यांना विरोध केला आहे मात्र चन्द्रशेखर यांनी कायम आपली भूमिका मायावती आणि बहुजन समाज पार्टीला सपोर्टिव्ह असल्याचेच  प्रतिपादन केले आहे.मात्र मायावतींना चंद्रशेखर यांच्या भूमिकेवर विश्वास नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!