Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सैन्यदलातील दर्जाहीन जेवणावर आवाज उठवणारा जवान तेज बहाद्दूर मोदींविरुद्ध लढण्याच्या पवित्र्यात

Spread the love

सैन्यदलातील दर्जाहीन जेवणावर आवाज उठवणारा  बडतर्फ बीएसएफचा जवान तेज बहाद्दूर तुम्हाला आठवत  असेलच !! जावं याच जवान महोदयांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून लढण्याचा इरादाजाहीरकेलाआहे.मागच्यावेळीआपचेनेतेअरविंदकेजरीवालयांनीत्यांनालढतदिलीहोती.यावेळी त्यांच्या विरोधात लढ्याची घोषणा या आधी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी केली आहे तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उभे राहण्या संदर्भात विचार करीत आहेत.

दरम्यान हरियाणातील रेवारीयेथे शुक्रवारी जवा तेज बहाद्दूर यादव यांनी स्वतः पत्रकारांना ही माहिती दिली. २०१७ मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील २९ व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती.

पत्रकारांशी  , कि मी मोदींविरोधात वाराणसीमधून अपक्ष म्हणून उभा राहणार आहे. मी सैन्यातील भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. सैन्य दलातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केल्याचे तेज बहाद्दूर यांनी सांगितले. हे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती. बहाद्दूर यांच्याकडे दोन मोबाईल बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच सैन्याच्या गणवेशात असताना सोशल मिडियावर फोटो टाकल्याने  सैन्याचे नियम तोडल्याचा आरोप ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!