Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक ! माथेफिरू मुलाकडून भाईंदरमध्ये ८५ वर्षांच्या आईची हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

भाईंदरमध्ये एका माथेफिरू मुलाने त्याच्या ८५ वर्षांच्या आईची हत्या केली आहे. रमा मित्रा असं या वृद्धेचं नाव आहे. तर सोमनाथ मित्रा असं तिच्या मुलाचं नाव आहे. आज सकाळी ८.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सोमनाथ मित्रा या ४५ माथेफिरू मुलाने त्याच्या ८५ वर्षीय आईचं डोकं फरशीवर आपटून तिची क्रूरपणे हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर सोमनाथ रक्ताने माखलेले हात घेऊन खिडकीजवळ बडबड करत होता.

Advertisements

हा सगळा प्रकार ज्या लोकांनी पाहिला त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. भाईंदर येथील मांडवी तलावाच्या शेजारी असलेल्या प्रतीक्षा इमारतीत सोमनाथ आणि त्याची आई रहात होते. आईची हत्या केल्यानंतर सोमनाथ खिडकीजवळ बडबड करत होता. ज्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. सोमनाथ कोणतंही काम करत नव्हता. आई मला सातत्याने नोकरीवरून बोलत होती. तसेच भांडण करत होती त्यामुळे रागाच्या भरात मी तिची हत्या केली अशी कबुली या आरोपीने दिली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!