Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” तो ” म्हणाला न्यायालयाला, राहुल गांधींची सत्ता आल्यास पत्नीला साडेचार हजाराची पोटगी देईन …मग कोर्टाने काय केले वाचा …

Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली सत्ता आल्यावर गरीबांना महिन्याला सहा हजार रुपये देऊ अशी घोषणा केली होती. त्यावर एका बेरोजगार पतीने कोर्टात म्हटले की, ‘जर काँग्रेस सत्तेत आली तर महिन्याल्या मिळालेल्या सहा हजारांपैकी साडे चार हजार रुपये देऊ’ असे वचन दिले आहे. न्यायालयानेही त्याचे म्हणने मान्य केले आहे.

मध्य प्रदेशमधील इंदूरमधील आनंद शर्मा याचे १३ वर्षापूर्वी दीपमालाशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांना एक मुलगीही झाली. परंतु दोघांमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत होते. अखेर दीपमालाने आनंदशी फारकत घेण्याचे ठरवले. न्यायालयाने या प्रकरणी आनंदला दर महिन्याला दीपमालाला तीन हजार रुपये व मुलीला दीड हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. यावर आनंदने न्यायालयाला सांगितले की मी सध्या बेरोजगार आहे. जेव्हा राहुल गांधीचे सरकार येईल तेव्हा त्यांनी दिलेल्या वचनानुसार ते प्रत्येक बेरोजगाराला सहा हजार रुपये देतील. त्यापैकी मी साडे चार हजार माझ्या पत्नीला देईन असे वचन त्याने दिले. न्यायालयानेही त्याची ही बाजू मान्य करत पुढील सुनावणी २९ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!