राजनाथ, जेटली, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्यासह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही हजर होते. गुजरात येथील गांधी नगर या ठिकाणाहून अमित शाह भाजपाचे उमेदवार आहेत. आज सकाळपासूनच त्यांनी गांधी नगर या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि काही वेळापूर्वीच आपला अर्ज दाखल केला.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातीच आपला देश सुरक्षित राहू शकतो असं म्हणत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांनी सभेला सुरुवात केली. या सभेला एनडीए घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हजेरी लावली. त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

Advertisements
Advertisements

यावेळी बोलताना अमित शाह यांनी देशाचं नेतृत्व कोण करणार या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार असल्याचं सांगितलं. संपूर्ण देशभरातून फक्त नरेंद्र मोदींचंच नाव ऐकू येतं असून पाच वर्षात इतका विश्वास कसा काय निर्माण झाला ? ७० वर्ष देश ज्या नेतृत्वाची वाट पाहत होता ते नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रुपात मिळालं आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

 

आपलं सरकार