Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून पुन्हा महामंडलेश्‍वर शांतिगिरी महाराजांची चर्चा , भाजपकडून इच्छुक होते महाराज

Spread the love

वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्‍वर बहुचर्चित शांतीगिरी महाराज पुन्हा एकदा औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्‍यता आहे. आज शांतिगीरी महाराजांसाठी दोन उमेदवारी अर्ज नेण्यात आले असून ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. २००९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून शांतिगीरी महाराजांनी दीड लाखांवर मते मिळवून प्रमुख पक्षांना धक्का दिला होता. सरकानामाने दिलेल्या वृत्तानुसार औरंगाबाद, नाशिक किंवा जळगांव या तीनपैकी एका मतदारसंघातून शांतिगीरी महाराज निवडणूक लढवणार अशी जोरादर चर्चा गेली दोन-तीन महिने सुरू होती. भाजपकडून निवडणूक लढवण्यास ते इच्छूक असल्याचे देखील सांगितले जात होते. पंरतु सगळ्याच प्रमुख पक्षांचे जागा वाटप झाले, पंरतु वरील एकाही मतदारसंघासाठी भाजप किंवा अन्य पक्षांनी शांतिगिरी महाराजांचा विचार केला नाही. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वेरूळच्या आश्रमात शांतता होती.

शांतिगीरी महाराज निवडणूक लढवणार का? की अन्य कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देणार या संदर्भात विविध तर्क लढवले जात होते. राजकारणाच्या शुध्दीकरणासाठी आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण स्वःत आणि राज्यातील इतर मतदारसंघामध्ये देखील उमेदवार देणार असल्याचे भक्तांसोबत झालेल्या अनेक बैठकांमध्ये शांतिगीरी महाराजांनी संकेत दिले होते. परंतु नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद या तिन्ही मतदारसंघासाठी शांतिगिरी महाजांचा विचार झाला नाही. त्यामुळे ते आणि त्यांचा भक्त परिवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 2009 मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवत शांतिगिरी महाराजांनी तब्बल 1 लाख 60 हजार मते मिळवली होती. त्यामुळे शिवसेनेचे तत्कालीन विजयी उमेदवार चंद्रकांत खैरे यांचे मताधिक्‍य कमालीचे घटले होते.

आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएम, शिवस्वराज्य बहुजन पक्ष, आमदार अब्दुल सत्तार हे देखील अपक्ष निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी शांतिगिरी महाराजही मैदानात उतरले तर लोकसभेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. आता उमेदवारी अर्ज खरेदी केल्यानंतर शांतिगिरी महाराज तो कोणत्या दिवशी दाखल करणार? ते अर्ज कायम ठेवून प्रत्यक्ष निवडणूक लढवतात की माघार घेतात याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!