Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभ्यासाच्या तणावामुळे मेंदुची शिर तुटली, तरुण अभियंता संतोष जाधव यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ

Spread the love

अभ्यासाच्या तणावामुळे मेंदुची शिर तुटल्याने  संतोष जाधव या अभियंता तरुणाचे आकस्मिक निधन झाल्याची माहिती त्यांचे मित्र प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी आपल्या फेसबुक अकौंटवर दिली असून त्यांच्या मृत्यूबद्दल  हळहळ व्यक्त होत आहे .

या संदर्भात त्यांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता या पदाची स्पर्धा परीक्षा मंगळवार दि.26 मार्च रोजी औरंगाबाद येथे होती. ही परीक्षा देण्यासाठी संतोष प्रकाशराव जाधव हा तरुण अभियंता मोठे स्वप्न घेऊन लातूरवरून औरंगाबादला जाण्यासाठी रविवार दि.२४  मार्च रोजी संध्याकाळी निघाला होता. सोमवार दि.25 मार्च रोजी औरंगाबाद येथे तो पहाटे मित्राच्या रूमवर गेला. तिथेच त्याला उलट्या झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले पण तिथे तो बेशुद्ध झाल्याने त्याला मोठ्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.तिथे काहीच इलाज न झाल्याने तिथूनही त्याला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु कुठलाच उपचार न झाल्याने अखेर संतोष जाधव यांची प्राणज्योत मालवली. संतोष जाधव हा अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर आणि औरंगाबादच्या महाविद्यालयात बी.ई. इलेक्ट्रॉनिक झालेला होता. त्याला चांगले पॅकेज आले होते परंतु स्पर्धा परीक्षेतून त्याला खूप मोठे होऊन आई वडीलांचे स्वप्न साकार करायचे होते.
संतोष सतत आपल्या अभ्यासात व्यस्त असायचा मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता या स्पर्धां परीक्षेसाठी त्यांनी खूप ताण घेऊन अभ्यास केला होता. सतत जागरण अभ्यासाचा ताण अवेळी जेवण हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरले रविवार दि.२४  मार्च रोजी तो लातूरवरून औरंगाबाद कडे परीक्षेसाठी निघाला जाताना त्याने उशिरा जेवण केल्याने अन्नाची त्याला विषबाधा झाली होती. यामुळेच त्याला जास्त उलट्या झाल्याने मेंदूला ताण पडला आणि मेंदूतील शिर तुटल्यामुळे रक्तस्त्राव झाला व त्याच वेळी तो बेशुद्ध झाला त्याच्या मित्राने त्याच्यासाठी खुप आटोकाट प्रयत्न केले.
संतोष जाधव यांचे आई वडील सुनेगाव शेंद्री ता. आमदपुर जि. लातूर येथे राहतात त्याच्या मित्रांनी शर्थीचे  प्रयत्न केले परंतु अखेर त्यांना त्याच्या मित्राला वाचवता आले नाही.  संतोष जाधव यांचे स्पर्धा परीक्षा देऊन मोठे होण्याचे स्वप्न मात्र कायमचे स्वप्नच राहून गेले. तीन दिवस चाललेली मृत्युची झुंज अखेर संपली. संतोष जाधव यांचे वडील प्रकाश जाधव एल आय सी मध्ये क्लब मेंबर आहेत. आई घरगुती काम करते. संतोष जाधव यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे त्याच्या दुखद निधनाने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे अचानक जाणे हे काळजाला धक्का देऊन गेले. अशी प्रतिक्रिया प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!