अवधूत वाघाच्या आगाऊ ट्विटमुळे शेतकऱ्यांची मुले वाघावर खवळले…

Spread the love

शेतकऱ्यांची मुलं म्हणजे लावारिस असतात, असे संतापजनक ट्वीट भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केल्याचे समजताच  त्यांच्या या ट्वीटविरोधात सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपच्या या वाघाच्या आगाऊ ट्विटमुळे शेतकऱ्यांची मुले वाघावर खवळले आहेत.

भाजपच्या या वाचाळ वाघाचा वाह्यातपणा एबीपी माझा ने उघडकीस आणताच भाजपचे धाबे दणाणले. वस्तुस्थिती उघड करणा-या पत्रकारांच्या बाजुने लिहिताना, मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्वीटला उत्तर देताना वाघ यांनी हे ट्वीट केलं. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्वीटला वाघ यांनी ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात, असं ट्वीट केलं आहे. ज्यामुळे सध्या चौफेर संताप व्यक्त केला जात आहे.

अवधूत वाघ यांनी याआधीही बेताल वक्तव्यं केली आहेत. मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार आहेत, असं भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटलं होतं. भाजपने वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना कोणत्याही माध्यमांशी बोलण्यास बंदी देखील घातली होती.

दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले लावारिस असतात या भाजपच्या प्रवक्त्यांच्या वादग्रस्त ट्वीटवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना  लावारीस म्हणणं हा शेतकऱ्यांचा मोठा अपमान आहे. यावरुन भाजप सरकारला किती मस्ती चढलीय हे दिसून येतंय असे पाटील सांगलीत बोलताना म्हणाले.

 

 

आपलं सरकार