Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दिवसभरातल्या #टॉप २० महत्वाच्या बातम्या …

Spread the love

1. खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घेतली भेट, परिस्थिती काहीही असो, निवडणूक पाटनासाहिब मतदारसंघातून लढवणार  – शत्रुघ्न सिन्हा

2. शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांचा यादीत समावेश

3. ए-सॅट म्हणजे काही जणांना थिएटरचा सेट वाटला; नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका

4. पंतप्रधान मोदींनी 1 महिन्यापूर्वी भाषण दिलेल्या पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे धनंजय बळीराम नव्हाते या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या.

5. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आज सोलापूर दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सात ठिकाणी घेणार सभा.

6. निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण कसं केलं? बसप नेत्या मायावती यांचा सवाल

7. मुंबई – महाराष्ट्रातील सपा-बसपा आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर

8. लहान मुलांच्या विधानांवर मी बोलत नाही; ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला

9. लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी सात उमेदवारांनी अर्ज घेतले मागे, आता २४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात

10. सवर्ण गरिबांना दिलेल्या १० टक्के आरक्षणाचं प्रकरण घटनापीठाकडे सोपवावं की नाही, यावर सुप्रीम कोर्ट ५ एप्रिलला निर्णय देणार

11. राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांवरून मुंबई हायकोर्टाने देवेंद्र फडणवीसांना सुनावले

12. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पडळकर माढातून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार; महादेव जानकर यांना धक्का.

13. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघांतून आघाडीच्या सुप्रिया सुळे, युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासह १९ इच्छुकांनी घेतले अर्ज.

14. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून २१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले.

15. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीतून आले. त्‍यांच्‍यासोबत राष्‍ट्रवादीचे नेते जयंत पाटील होते .

16. जळगाव काँग्रेसचे पदाधिकारी अजबराव पाटील यांच्या तोंडाला कॉंग्रेस भवनात फासले काळे, अंतर्गत वादातून घडला प्रकार

17. अहमदनगर जिल्ह्यातील  जामखेड तालुक्यातील चौंडी गावात चापडगाव येथील आरती पांडुरंग सायगुडे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला.

18. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता, निवडणुकीपूर्वी सामान्यांना मिळणार दिलासा.

19. आपचे पंजाबमधील नेते आणि खासदार हरिंदर सिंह खालसा यांचा भाजपामध्ये प्रवेश.

20. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून खोतकर यांना वगळले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!