Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : कोण आहेत या महिला खासदार ? ज्यांनी मोदी सरकारला सर्वाधिक प्रश्न विचारले ?

Spread the love

देशात घडलेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर सोळावी लोकसभा अनेक अर्थाने गाजली. नोटबंदी, जीएसटी, पंतप्रधानांचे विदेश दौरे, देशात घडलेल्या दलित-मुस्लिमांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना, ट्रिपल तलाक या विविध मुद्द्यांनी मोदी सरकारची पाचव र्षेगाजली. आपल्या या पाच वर्षाच्या कार्यकाळानंत रआता एप्रिलमध्ये नरेंद्र मोदी सरकारची परीक्षा होत आहे. या परीक्षेत देश , मोदींना पास करायचे कि नापास करतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान १६व्या  लोकसभेत गेल्या पाच वर्षात काय झाले हे पाहणे रंजक आणि माहिती पूर्ण आहे.

सोळाव्या  लोकसभेत एकूण २७३ विधेयके दाखल करण्यात आले त्यापैकी  २४० विधेयके पास झाली तर २३ विधेयके प्रलंबित राहिली. निवडणूक देखरेख संघटनेच्या ‘एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफार्म्स’ (एडीआर) च्या वतीने काल जारी  करण्यात आलेल्या अहवालात हि माहिती देण्यात आली आहे . या अहवालात म्हटले आहे कि , दिल्लीतील सात खासदारांची उपस्थिती सरासरी सर्वाधिक राहिली. त्यांनी ३१२ बैठकीपैकी २८९  बैठकीत आपली उपस्थिती नोंदवली.

उपस्थित खासदारांनी गेल्या पाच वर्षात सरासरी २५१ प्रश्न विचारले . त्यांनी ३१२ बैठकीत २२१ खासदारांनी  भाग घेतला . नागालँड च्या दोन खासदारांनी सरासरी ८८ बैठकांमध्ये आपला सहभाग नोंदवला, जो सर्वात कमी सहभाग आहे . संसदेत सर्वाधिक ११८१ प्रश्न  विचारण्याचा बहुमान बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जातो .

संसदेत खासदारांची कमी उपस्थिती याविषयावर २०१७ मध्ये  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) चे  महासचिव खा.  सीताराम येचुरी यांनी संसदेतील खासदारांच्या कमी उपस्थितीवरून चिंता व्यक्त केली होती . त्यांनी सभागृहाला अशी विनंती केली होती कि , कमीत कमी १०० दिवस खासदारांना उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी . यामुळे खासदारांचे देश्याच्या प्रति उत्तरदायित्व स्पष्ट होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन वर्षात केवळ ६० ते ७० दिवस संसदेच्या वर्षाला बैठका झाल्या वास्तविक हि संख्या असमाधानकारक नाही . अशाने देश्याच्या समस्या कशा सुटतील ? ब्रिटनमध्ये वंशाला २०० दिवस संसदेच्या बैठकी घेतल्या जातात .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!