Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : बिस्किटाचा पूड चोरला म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांचा खून करून मृतदेह पुरला

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तराखंडमधील एका निवासी शाळेमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा क्रिकेटच्या बॅटने अमानुष  मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेने मृत विद्यार्थ्याच्या पालकांना न सांगताच या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या आवारात पुरून टाकला. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणावर प्रकाश पडला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे .
पोलिसांनी सांगितले की, ही घटना १० मार्चची आहे. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तराखंड कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सच्या डेहरादूनच्या एएसपी निवेदिता कुकरेती यांनी सांगितले की, १२ वर्षाच्या या मृत विद्यार्थ्याचे पालक उत्तर प्रदेशमधील हापुडमध्ये राहतात. त्याला त्याच्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत ठार केले.

Advertisements

खरेतर मृत विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या शेजारील एका दुकानातून बिस्किटचा पुडा चोरला होता. याची तक्रार या दुकानदाराने शाळेकडे केली होती. यामुळे शाळा प्रशासनाने हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना विना परवानगी बाहेर जाण्यावर बंदी घातली होती. यामुळे त्याच्या वरच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. या रागातून या विद्यार्थ्यांनी त्याला जवळपास 1 तास मारहाण केली. जेव्हा याची माहिती शाळेला समजली तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्याला मुर्च्छित अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisements
Advertisements

सर्वात धक्कादाक म्हणजे शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी मृत झाल्याचे त्याच्या पालकांना कळवायला हवे होते. मात्र, त्यांनी पोलिसांनाही याबाबत काहीच कल्पना न देता मृतदेहाची विल्हेवाट लावली. शाळेने हे खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला व मृतदेह पुरला. पोलिसांनी या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांसह पाच जणांना अटक केली आहे.   पोलिसांनी शाळेच्या आवारातून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!