Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दावत मधील बिर्याणीमुळे पडेगाव मदरशातील 67 मुलींना विषबाधा; उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद शहरातील पडेगाव येथील एका मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थींनींना सिल्लेखाना येथे आयोजित एका समारंभात जेवणासाठी दावत देण्यात आली होती. या दावतीत बिर्याणी खाल्यानंतर पडेगाव येथील मदरशामध्ये परतलेल्या 67 मुलींना  जेवणातून विषबाधा झाली. या विद्यार्थींनींना तातडीने घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील काही मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मदरशातील विद्यार्थीनींची प्रकृती चिंताजनक होताच, ८० मुलींना एका पिकअप ट्रकमध्ये कोंबून आणल्याची माहिती मदरशातील मुलींच्या नातेवाईकांनी दिली. मुलींच्या नातेवाईकांनी मदरशातील व्यवस्थापकीय मंडळींना अशी कृती केल्याबाबत जाब विचारून संताप व्यक्त केला.

दावतनंतर 67 मुलींना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील मदशात घडली. या सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत. यातील दोघींची प्रकृती गंभीर असून, अन्य मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.

शहरातील पडेगाव भागातील एका मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या ५ ते ११ वर्ष वयोगटातील विद्यार्थीनींना सिल्लेखाना भागातील एका ठिकाणी जेवणासाठी बोलविण्यात आले होते. या मुलींना जेवणासाठी सायंकाळी नेण्यात आले. जेवणात बिर्याणी खाल्यानंतर या मुलींना परत पडेगाव येथील मदरशांमध्ये आणण्यात आले. पडेगावात आल्यानंतर या मुलींना मळमळ होणे, उलटी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, थंडी वाजून येणे अशा प्रकारचा त्रास सुरू झाला. मदरशांच्या व्यवस्थापकांनी तातडीने या मुलींना घाटी रूग्णालयात दाखल केले. एकाच वेळी ८० विद्यार्थींनींना दाखल करण्यात आल्याने घाटी रुग्णालयात धावपळ सुरू झाली. आपल्या मुलींना त्रास होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलींच्या नातेवाईकांनीही घाटी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्यावर घाटीत तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती बालरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आमदार इम्तियाज जलील आणि महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह आमदार सतीश चव्हाण यांनी रुग्णालयात मुलींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!