Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : मला आणि प्रणितालाही भाजपने ऑफर दिली होती : सुशीलकुमार शिंदे

Spread the love

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार  आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपमधून ऑफर होती, असा दावा केल्यामुळे सुशीलकुमार शिंदे चर्चेचा विषय  झाले आहेत. पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे आपण भाजपप्रवेशाची ऑफर धुडकावून लावल्याचं सुशीलकुमार शिंदेंनी आवर्जून सांगितलं. भाजपच्या एका बड्या नेत्याची ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता माझ्या तोडीचा होता, असं सांगतानाच सुशीलकुमार शिंदेंनी त्यांचं नाव मात्र उघड केलं नाही . आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उध्दभवत नाही असंही सुशीलकुमार शिंदेंनी म्हणाले . सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून काँग्रेस आमदार आहेत. त्यांनाही  वारंवार भाजपप्रवेशाच्या ऑफर येत असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदेंनी केला. शिंदे यांच्या  वक्तव्यामुळे  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  त्यांची लढत बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्याशी होत आहे.

दरम्यान, सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले , तरुणांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे  सुजय विखे-पाटील यांनी पक्षांतर करणं गैर नाही . सुजय विखेंच्या भाजपप्रवेशाबाबत बोलताना सुशीलकुमार म्हणाले होते की, प्रत्येकाला करिअर करायचं असतं. तिकीटवरुन नाराजी म्हणून तरुण पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही.

याविषयी आणखी बोलताना ते म्हणाले कि,  भाजपाच्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही भाजपात येण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत. भाजपा जातीधर्माचे राजकारण करत आहे. हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या निवडणुकीत लोक भाजपाला थारा देणार नाहीत. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूकडून संविधानाला गाडण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!