Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Imtiaz Jalil : ठरले !! आ.इम्तियाज जलील वंचिततर्फे लढणार !! विषय संपला…

Spread the love

बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून एम आय एम च्या वतीने आ. इम्तियाज जलील हे औरंगाबादच्या लोकसभेच्या आखाड्यात अखेरीस उतरत आहेत. महानायक ऑनलाईनच्या युजर्सना आणि वाचकांना आठवत असेल कि, महानायक ऑनलाईन शी बोलतानाच पहिल्यांदा आ. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादसह दोन जागा देण्याची मागणी आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे करणार आहोत अशी भूमिका स्पष्टपणे मांडली होती.

आपल्या मागणीनुसार त्यांनी प्रयत्नही सुरु केले. परंतु या जागेवर वंचीत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथील सभेत न्या.बी.जी.कोळसेपाटील यांच्या नावाची घोषणा केली होती, परंतु वंचित बहुजन आघाडीची  काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी युती न झाल्यामुळे औरंगाबादसह दोन जागा एम आय एम लाख मिळाव्यात अशी भूमिका आ. जलील यांनी मांडली. ज्या शहरात आमचे २५ नगरसेवक आहेत तिथे आम्ही नाही लढायचे तर मग कुठे लढायचे ? अशी कार्यकर्त्यांची चर्चा सुरू झाली त्यामुळे औरंगाबादच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला.

या वादावर तोडगा काढत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला की, न्या.बी.जी.कोळसेपाटील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नसून ते देवेगौडा यांच्या जनता दलाचे उमेदवार असून याबाबत जर एम आय एम लाख औरंगाबाद लोकसभेची जागा पाहिजे असेल तर ओवेसी यांनी देवेगौडा यांना बोलून हि जागा त्यांच्यकडून सोडवून घ्यावीत. ओवेसींच्या आणि देवेगौडा चांगले मित्र आहेत. माझ्या दृष्टीने हा विषय संपला असून ते जो उमेदवार देतील तोच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असेल.

दरम्यानच्या काळात न्या.बी.जी.कोळसेपाटील यांच्या लक्षात आले की, वंचीत बहुजन आघाडीची काँग्रेसबरोबर युती होत नाही, त्यामुळे केवळ वंचित बहुजन आघाडीच्या जोरावर निवडून येण्याचे गणित जमणार नाही. काॅंग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती शिवाय निभाव लागणार तर नाहीच पण आपल्या उमेदवारीचा फायदा थेट मोदी आणि भाजपला होईल म्हणून त्यांनी एक भूमिका घेऊन औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. याचा खुलासाही त्यांनी जाहिर केला. त्यांचे बरेच पडसाद उमटले पण हा त्यांच्या दृष्टीने हा विषय संपला.

दरम्यान या जागेवर आ. इम्तियाज जलील यांची मागणी गांभीर्याने घेत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादसह मुंबईचीही ते मागतील ती जागा देण्याचे घोषित केले.‌ त्यानुसार खा. असदुद्दीन ओवेसी यांचे मन वळवून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली आहे.

यासंदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन म्हटले आहे की, माझ्या प्रिय औरंगाबाद शहरासाठी मी औरंगाबाद लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एम आय एमच्या तिकिटावर लढवित आहे. शहर आणि जिल्ह्याचा विकास हा माझा अजेंडा आहे. मंदिर-मशिदीच्या भावनिक मुद्यांपेक्षा शहराचा औद्योगिक आणि शिक्षण, आयटी हब, सार्वजनिक स्वच्छता या क्षेत्रासाठी काम करण्याची माझी मनस्वी इच्छा आणि ध्येय आहे. म्हणूनच मी लढत आहे.

#AbhiNahiTohKabhiNahi #Jaleel4Aurangabad

 

 

 

 

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!