Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“घर फिरले कि वासे फिरतात !!” तशी काँग्रेस -राष्ट्वादीची अवस्था , “घरच्या भेदीं”मुळे नेतृत्व झाले त्रस्त !!

Spread the love

भाजप -सेनेच्या वतीने प्रचाराचा धूमधडाका सुरु झाला असला तरी महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपामुळे प्रचंड घोळ झाले असल्याने हे दोन्ही पक्ष मोठ्या गोंधळात अडकले आहेत.राष्ट्र्वादीत पक्ष प्रमुख शरद पवार यांचा कोणी मान ठेवेनासे झाले आहे तर काँग्रेसमध्येही आनंदी आनंद आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचे सोडा दस्तुरखुद्द राहुल गांधी यांनी स्वतः फोनवर बोलूनही राधाकृष्ण विखेपाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे भाजपच्या घरात जाऊन बसले आणि  भाजपनेही हि संधी घेत सुजयला कडेवर घेऊन आपल्या खासदाराला तिकीट नाकारून नगर दक्षिण मधून तिकीट दिले आहे . ज्या काही जागांवर काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिलेत्या पैकी काही जागांवर कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. मधाची जागा पवारांना चांगलीच जखम करून गेली. पण थांबतील ते पवार कसले पवार राजकीय बुद्धिबळाच्या खेळातील कसलेले खेळाडू आहेत. आलेल्या अडचणींवर मात करीत पुढे कसे जायचे हे खरे तर शरद पवार यांच्यापासून शिकले पाहिजे. म्हणूनच कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना आपले गुरु मानत असावेत, त्यांनी स्वतःच हे एकदा जाहीर सभेत सांगितले होते.

आज विदर्भात सात जागांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना काँग्रेसचे घोळ संपायला तयार नाहीत . मुदत संपण्याला काही तास राहिले असतानाच रामटेकमधून पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी केलाय.  काँग्रेसने आधी जाहीर केलेल्या यादीत या जागेवरून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली होती पण नितीन राऊत यांना आक्षेप आहे म्हणून  गजभिये हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेच होते.तेवढ्यात नितीन राऊत हेही  काँग्रेसच्या वतीने अर्ज भरण्यासाठी तिथे दाखल झाले. पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचा दावा त्यांनी केला.  या आधीच  चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसने बदलला होता. तर औरंगाबादला अब्दुल सत्तार यांनीहीकाँग्रेसचे उमेदवार  सुभाष झांबड यांच्या विरोधात अकांड तांडव सुरु केले आहे . गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या पत्रकार परिषदा चालू आहेत .  त्यामुळे पक्षात नेमके काय चाललंय असा प्रश्न आता विचारला जातोय.

काँग्रेसमधून राजीनामा दिलेले बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं आज स्पष्ट केलं. अशोक चव्हाण हेत माझे नेते आहेत असंही ते म्हणाले. पुढे कुठली भूमिका घ्यायची याचा निर्णय २९ मार्चला जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं. बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने काँग्रेसने उमेदवारी देण्याची ऑफर दिली असा खुलासाही त्यांनी केला. काँग्रेसने या ठिकाणी सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. सत्तार यांना औरंगाबादमधून लोकसभेचं तिकीट हवं होतं. पण तिकीट मिळालं नसल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनाम दिला होता. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर सुभाष झांबड आणि स्वतः अशोक चव्हाण यांनी सांगितले कि जेंव्हा आधी अब्दुल सत्तर यांना ईमेदवारीविषयी विचारले होते तेंव्हा त्यांनी नकार दिला होता मग अबदुल सत्तर असे का वागत आहेत ? हा हि एक प्रश्नच आहे . विशेष म्हणजे अब्दुल सत्तर ज्या मतदार संघाचे नेतृत्व करतात तो मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघात येतो . परंतु मी औरंगाबाद येथे  मला औरन्गाबाद मधूनच लोकसभेची उमेदवारी हवी होती असा हट्ट धरीत त्यांनी बंडखोरीची भाषा सुरु केली आहे . यामुळे पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे . हिंगोलीत खासदार राजीव सातव यांनी यंदा उमेदवारी नाकारल्याने हिंगोलीच्या जागेवर शिवसेनेतून आलेले सुभाष वानखेडे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली . तर नांदेडहून आपल्या पत्नीला तिकीट द्यावे असे अशोक चव्हाण यांनी पक्षाला सुचविले होते . परंतु पक्षाने अमित चव्हाण यांना तिकीट न देता अशोक चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे . चंद्रपूरची उमेदवारी नव्याने सेनेत आलेल्या आमदाराला देण्यात यावी असा अशोक चव्हाण यांचा आग्रह होता परंतु त्यांनी सांगितलेल्या उमेदवाराला उमेदवारी न दिल्याने अशोक चव्हाण पक्ष नेतृत्वावर कमालीचे नाराज झाले होते परंतु अखेर पक्षाने त्यांच्या मताप्रमाणे उमेदवार बदलून त्यांना एक प्रकारे शक्तीच दिली आहे . या आधी काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवारही दोन वेळा बदलला आहे.

भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर युतीची बाजू भक्कम झाली. भाजप सेनेचं मोठं आव्हान असताना काँग्रेसमध्ये मात्र उमेदवाराच्या नावावरून घोळ सुरू आहे. विदर्भातल्या चंद्रपूर मतदारसंघातून सुरूवातीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल यांच्या नावाची चर्चा होती. त्यांचं नाव यादीतही होतं मात्र वेळेवर त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडेना उमेदवारी जाहीर झाली. बांगडे हे मुकूल वासनिक यांचे समर्थक मानले जातात. शिवाय स्वतः मुकुल वासनिक रामटेक वरून लढण्यास इच्छुक ओटे परंतु त्यांची इच्छाही पक्षाने पूर्ण केली नाही.

सांगलीमध्येही केंद्रात राज्यमंत्री पद भोगलेल्या प्रतीक पाटलांनीही काँग्रेस सोडून पक्षालादणका दिला आहे . त्यामुळे समोर भाजप आणि मोदींचे आव्हान असताना महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी समोर त्यांच्याच पक्ष कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आव्हाने उभी केल्याने अशा मानसिकतेतभाजप-सेनेला काँग्रेस कसे आव्हान देणार हा मोठा प्रश्न आहे. देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण भाजप आणि मोदींच्या विरोधात असताना काँग्रेसला त्याचा कुठेही फायदा घेता येत नाही अशी परिस्थिती आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!