Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत प्रकाश आंबेडकरांनी दाखल केली उमेदवारी

Spread the love

बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूरलोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरून सोलापुरातील राजकीय क्षेत्राला मोठा धक्का दिला. हा अर्ज भरण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरयांच्या पदयात्रेला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. न्यू बुधवार पेठ येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली.  यावेळी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर, शंकरराव लिंगे, शमी उल्ला शेख, श्रीशैल गायकवाड, प्राध्यापक डॉ. धम्मपाल माशाळकर आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी साडे नऊ वाजल्यापासून न्यु बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे कार्यकर्त्यानी तुफान  गर्दी केली होती. अकरा पंचेचाळीस वाजता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आगमन झाले. उद्यानांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला होता.

निळा, हिरवा, पिवळा आधी रंगाचे झेंडे कार्यकर्ते हातामध्ये घेऊन घोषणाबाजी करीत होते. दुपारी एकच्या सुमारास डॉ़ प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले याच्याकडे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी एमआयएमचे तौफिक शेख, श्रीशैल गायकवाड, शमीउल्लाह शेख, शंकरराव लिंगे, प्रा़ धम्मपाल माशाळकर आदी उपस्थित होते़

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!