Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नाराजीमुळे अखेर चंद्रपूरची उमेदवारी सेने रिटर्न आ . धानोरकरांना बहाल

Spread the love

काँग्रेसने देशभरातील १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले असून त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघाचा समावेश आहे. यापूर्वी चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश धानोरकर यांना या मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथील उमेदवारीवरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उद्विगनता दाखवली होती. अखेर काँग्रेसच्या हायकमांडने येथील उमेदवार बदलला. धानोरकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना लढत देतील. त्याचबरोबर हिंगोलीचे विद्यमान खासदार काँग्रेसचे राजीव सातव यांच्याऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने अकोला मतदारसंघातून हिदायत पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये तर हिंगोली मतदारसंघातून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. आपल्याला गुजरातमध्ये लक्ष द्यायचे असल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे या मतदारसंघातून सुभाष वानखेडे यांना तिकीट देण्यात आले आहे. गत निवडणुकी राजीव सातव हे अत्यंत थोडक्या मतांनी विजयी झाले होते. सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश धानोरकर यांनी गत आठवड्यात शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपा-सेना युतीवर नाराज असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, धानोरकर वारंवार काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे सांगत होते. मात्र, आता काँग्रेसने त्यांना थेटच उमदेवारी जाहीर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!