Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिक्षण, परीक्षा हे दलितांचे काम नाही म्हणून विद्यार्थ्यांला अमानूष मारहाण…

Spread the love

‘दलित समाजातील मुलानं शिक्षण घ्यायचं नाही तर काम करायचं’, असं म्हणत एका १२ वीच्या विद्यार्थ्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना गुजरातमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मेहसाणा येथे दलित समाजातील एका विद्यार्थ्याची सोमवारी १२ वीची परीक्षा होती. परंतु, गोराड गावातील आरोपी रमेश पटेल हा तरुणाकडे आला आणि महत्वाचे काम करायचे आहे, तुला माझ्यासोबत यावे लागेल, असे सांगितले. पटेल हा बस कंडक्टरची नोकरी करतो. पटेल आणि पीडित मुलगा एकाच गावातील असल्याने एकमेकांना चांगले ओळखतात. परीक्षा सुरू होण्याआधी आरोपीने या तरुणाला रस्त्यावर सोडले. त्याला झाडाला बांधले व निर्दयीपणे मारहाण केली, असे पीडित मुलाने पोलिसांना सांगितले.

आरोपीने या मुलाला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. मारहाण का करीत आहात?, असे विचारल्यावर आरोपीने म्हटले, तू दलित आहेस, तू शिक्षण घेण्याऐवजी आमचे काम कर, असे म्हटले. आरोपीने मुलाला अपशब्दचा वापर करीत तू परीक्षा देऊ नकोस, अशी धमकी दिली. बेदम मारहाणीनंतर मुलगा घरी पोहोचला. त्याने कुणालाही काही सांगितले नाही. पीडित मुलाच्या आईला मारहाणीच्या खूणा दिसल्याने मुलला याविषयी विचारले. त्यानंतर मुलाने घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. आईने मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन रितसर गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम, ३२३, ३४१, ५०४, ५०६ आणि ११४ अंतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!