पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्याचे पाकिस्तानने सांगताच भारतात राजकीय वादळ

Spread the love

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय दिनानिमीत्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी ट्विटरवर दिली असून त्यात त्यांनी म्हटले या आहे कि, लोकशाहीयुक्त , शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीसाठी उपमहाखंडातील लोकांनी एकत्र यावे जेथे हिंसा आणि दहशत वादाला कुठलेही स्थान नसेल. नरेंद्र मोदी यांच्या या संदेशाचे  स्वागत करून आम्ही भारताशी काश्मीरसहित सर्व मुद्द्यांवर बोलू इच्छितो अशी इच्छाही व्यक्त केली.

इम्रान खान यांच्या या ट्विटच्या नंतर भारतीय राजकारणात वादळ निर्माण झाले  असून काँग्रेसच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे अशी मागणी केलीआहे. त्यांनी म्हटले आहे कि, एका बाजूला भारत सरकारने पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनावर जाहीर बहिष्कार टाकला असून दुसया बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रानखान यांना शुभेच्छा देतात या संदर्भात मोदींनी खुलासा करणे करणे गरजेचे आहे.

नेशनल कॉन्फ्रेंसचे  नेता उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे कि , कि लोकांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आवाहन सरकारने केले असून त्याचाच एक भाग म्हणून मोदींनीही इम्रान खान यांना शुभेच्छा देणे उचित नाही .

विशेष म्हणजे विदेश मंत्रालयाचे  प्रवक्ता रवीश कुमार यांनी सूचित केले होते कि , भारत त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही . इस्लामाबाद येथील कार्यक्रमातही भारत सहभागी होणार नाही . तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वतःचा शुभेच्छा संदेश मात्र इम्रान खान यांना यावरून आता भारतात राजकारण तापू लागले आहे.दरम्यान हा प्रथा आणि परंपरेचा भाग असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.

आपलं सरकार