Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पक्षात कुणी ऐकत नसल्याने अशोक चव्हाण व्यथित : चव्हाण म्हणतात हि पक्षांतर्गत बाब…

Spread the love

‘माझे पक्षात कुणी ऐकत नाही …, मीही राजीनाम्याच्या विचारात आहे’, अशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कथित वक्तव्याची ऑडिओक्लिप ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. आपण हे बोललो आहोत असे चव्हाण यांनी स्पष्ट केले नसले, तरी या संभाषणाचा अशोक चव्हाण यांनी इन्कारही केलेला नाही.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत काँग्रेस पक्षात मतभेद असून याबाबत एका कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्याकडे आपले मत उघड करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलताना चव्हाण यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. काँग्रेसने चंद्रपूरमधून विशाल मुत्तेमवार यांच्या ऐवजी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन ने हे वृत्त दिले आहे .

व्हायरल झालेल्या या व्हिडिओक्लिपबाबत बोलताना अशोक चव्हाण एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले, की ‘त्या कार्यकर्त्याशी झालेले ते माझे खासगी संभाषण आहे. ते संभाषण सार्वजनिक करण्याचा विषय नाही. तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. माझ्याशी बोलणारी व्यक्ती ही काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता होती. त्याचे मनोबल राखणे हे माझे काम आहे. मी ती क्लिप ऐकलेली नाही. ती जरी क्लिप असली, तरी देखील चंद्रपूरमध्ये अनेक वादाचे विषय आहेत हे मान्य करायलाच हवे. चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेला वाद मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलेला आहे’. काँग्रेसने रात्री उशिरा ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राज्यातील ५ नावांचा समावेश आहे. काँग्रेसने या यादीत चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीसाठीही पक्षातून जोरदार प्रयत्न केले जात होते. शिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे चंद्रपूरमधून शिवसेनेचा राजीनामा दिलेले बाळू धानोकर यांच्यासाठी आग्रही होते.

दरम्यान, नवीनचंद्र बांदिवडेकरांबाबत उठलेले वादळ शमलेले आहे, असे म्हणत रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम असल्याचे स्पष्ट संकेत अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!