News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दुपारच्या बातम्या…

Spread the love

>>’सिंघम’ चित्रपटातील अभिनेते प्रकाश राज यांनी बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज, भाजपच्या पी. सी. मोहन यांच्याविरोधात निवडणूक लढणार

>> भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीला मुंबई हायकोर्टाकडून 2 एप्रिलपर्यंत स्थगिती

>> काँग्रेस नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

>> केंद्रीय मंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरनं भाजपमध्ये केला प्रवेश

>> ‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीत अटक, पुलवामा हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या होता संपर्कात

>> भारती पवार यांचं स्वागत, पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा नाही, माझा दिल्ली अजूनही विचार करेल, मला डावलून त्यांना तिकीट मिळालं तर माझ्यावर हा अन्यायच – हरिश्चंद्र चव्हाण

>> जायकवाडी धरणाची पाणीपातळी  मृतसाठ्यात . डेडस्टॉकमध्ये ४०% गाळ असल्याने औरंगाबादवर जलसंकट.

>> कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू

>> मंत्रालयातील कौशल्य विभागातील सचिव विजयकुमार भागवत पवार यांची राहत्या घरी आत्महत्या.

>> मुंबई परिसरातील विविध घटनांत १० जण बुडाले , वसई कळंब दुर्घटनेतील पाचही मृतदेह सापडले. कळंब समुद्रकिनारी गुरुवारी पाच जण बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

>> झारखंडमधील १० हजार पहारेकऱ्यांचा पगार रखडला; ‘मैं भी चौकीदार’ म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा हल्लाबोल

>> चीनमध्ये गर्दीच्या ठिकाणी कार घुसवली, ७ ठार…कार चालकाला पोलिसांनी घातल्या गोळ्या

 

आपलं सरकार