Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : माढ्याचा तिढा अखेर पवारांनी सोडवला , मोहितेंचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांना उमेदवारी

Spread the love

उस्मानाबादमध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माढ्याचा तिढा सोडवला असून या लोकसभा मतदार संघात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची उमेदवारी घोषित केली आहे . दस्तुरखुद्द  शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याने या चर्चेला आता पवारांनीच पूर्णविराम दिला. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी  भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच शिवसेना-भाजप यांच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. बारामती येथील एका सभेदरम्यान, संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे का म्हणायचे ? अशी विचारणा करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो, असे सांगितले. शिंदे यांच्यासह उस्मानाबादमध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचे   संजय शिंदे हे कट्टर विरोधक आहेत . वास्तविक मोहिते पाटलांना भाजपात प्रवेश देण्यापूर्वी संजय शिंदे यानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढ्याच्या उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र, आपण लोकसभा नाही, तर करमाळा विधानसभा लढविण्यास उत्सुक असल्याचे शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले होते . त्यानंतर मोहिते पाटील याचा भाजपत प्रवेश झाला. आता मोहिते भाजपवासी झाल्याने शिंदे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय शिंदे हे माढा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. ते मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी निमगाव टेंभुर्णीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे करमाळा विधानसभा लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि अध्यक्ष झाले. शिंदेहे म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे, तसेच विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. शिवाय माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचेही ते चेअरमन आहेत. शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!