कुणाचे काय अन कुणाचे काय ? कर्नाटक विधानसभा अध्यक्ष म्हणतात , मी पुरुषांसोबत झोपत नाही…

Spread the love

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना कोणता नेता कधी काय बोलेल याचा नेम राहिलेला नाही . कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते रमेश कुमार यांचे असेच एक विधान सध्या गाजत आहे . वास्तविक आपल्या वादग्रस्त विधानामुळे रमेशकुमार नेहमीच चर्चेत असतात .  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी प्रश्न विचारला असता रमेश कुमार यांनी ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’ असं उत्तर दिलं आहे. रमेश कुमार यांच्या विधानाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मुनियप्पा यांनी ‘रमेश कुमार आणि आपण पती, पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणदेशात त्याही प्रकारचा वाद नाही’ असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुनियप्पा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रमेश कुमार यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही. मी कोणासोबतही झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत’ असे रमेश कुमार यांनी म्हटले आहे. रमेश कुमार यांनी मुनियप्पा यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे. मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं असल्याची माहिती मिळत आहे.

आपलं सरकार